आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखर कारखान्यांनी 2750 रुपये प्रतिक्विंटल दर द्यावा; कांबळे, पाटील, कोकाटे यांचे रास्ता रोको

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी- गेल्या वर्षी कारखान्यांनी हजार ६०० रुपये दर दिला. या वर्षी जास्त दर द्यायला कारखान्यांना काय अडचण आहे? शेतकऱ्यांना हजार ७५० रुपये दर दिला पाहिजे. ही लढाई कारखानदारांच्या विरोधात नाही. तर शेतकऱ्यांची लढाई असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी केले. तालुक्यातील ऊस दराच्या मागणीसाठी भाजपने विविध संघटनांनी आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनात ते बोलत होते. 
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सोलापूर-पुणे बायपास महामार्ग आंदोलकांनी एक तास रोखून धरला. 


कांबळे म्हणाले, प्रतिटन २७५० रुपये ही मागितलेली पहिली उचल रास्त आहे. ती नाही दिली तर शेतकरी कारखानदारांना किंमत मोजायला लावतील. येथील कारखान्याने अनेक राष्ट्रीय विक्रम केले आहेत. त्यांनी जास्त दर देण्याचाही विक्रम करावा. मनात आले तर तीन हजार दर देण्याचीही धमक त्यांच्यात आहे. आमदार बबनराव शिंदे यांचे नाव घेता त्यांनी टीका केली. 


भाजप तालुकाध्यक्ष संजय कोकाटे म्हणाले, कुणीतरी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझे कर्तव्य समजून आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. एफआरपीवर दर देण्याची पद्धत पुढे आली तेव्हापासून कारखान्यांनी रिकव्हरी चोरण्यास सुरुवात केली आहे. १७ वर्षांची रिकव्हरी तपासावी, असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.

बातम्या आणखी आहेत...