आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर मंडपाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अंमल पुढील वर्षीपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यावर मंडप मारण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वांचा अंमल मे २०१६ पासून करण्याचा निर्णय महापालिका सभेत एकमताने घेण्यात आला.
याबाबत शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मार्गदर्शक तत्त्वे तयार करून तत्काळ अंमलबजावणी करा, असा आदेश महापालिकेस दिला. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सभेपुढे प्रस्ताव दाखल केला. त्यात १५ प्रकारची नियमावली तयार केली आहे. त्यावर विशेष सभेत सोमवारी चर्चा झाली.

काँग्रेसमध्ये मतभेद
सत्ताधारीकाँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. अनिल पल्ली, देवेंद्र भंडारे यांनी यावर प्रशासनाकडे बोट दाखवत, या प्रस्तावाच्या नावाखाली प्रशासन मंडळावर दबाव टाकू शकतात, असे मनोगत व्यक्त केले. चेतन नरोटे आणि अॅड. यू. एन. बेरिया यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य करत तत्काळ अंमलबजावणी करा. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय आहे. जनमनातला निर्णय आहे. त्यामुळे तत्काळ अंमलबजावणी करा, असे म्हटले. या वेळी नगरसेवक मनोहर सपाटे, जगदीश पाटील, आनंद चंदनशविे, पांडुरंग दिड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी दुरुस्तीसह एकमताने ठराव मान्य करण्यात आला.

दोन निर्णयांत बदल
मंडपरस्त्यावर २५ टक्के पेक्षा जास्त असणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्व होते. त्यात बदल केले. जिथे रस्ता दुभाजक आहे. त्यापैकी एका रस्त्यावर ५० टक्के तर ज्या ठिकाणी दुभाजक नाही त्या रस्त्यावर ५० टक्के मंडप मारण्यास परवानगी देणे असे दोन बदल करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...