आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवानी पेठ केंद्रातील पंप जळाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाणीपुरवठा करणाऱ्या भवानीपेठ पंप हाऊसमधील १२५ एचपीची मोटार गुरुवारी पहाटे जळाली. याला जबाबदार धरून आयुक्त विजयकुमार काळम -पाटील यांनी उपअभियंता संतोष यलगुलवार यांना ताबडतोब निलंबित केले. हा प्रकार नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी निदर्शनास आणून दिला.
पर्यायी पंप असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. केंद्रात २५० एचपीचे २, १२५ एचपीचे ३, ९० एचपीचे असे एकूण पंप आहेत. यातील एक-एक पंप दररोज वापरला जातो तर उर्वरीत स्टॅन्डबाय आहेत. जळालेला पंप दुरुस्तीनंतर दहा ते बारा दिवसांत सुरू होईल. तोपर्यंत दोन शिल्लक असलेल्या पंपापैकी एक पंप वापरण्यात येणार आहे. उजनीमधून कमी पाणी आले की सर्व पंप एक तासासाठी बंद करावे लागतात. एक तासानंतर पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत केला जात असल्याची माहिती फिटर रतन भोसले यांनी दिली.
उपअभियंता संतोष यलगुलवार यांनी प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता आर. एन. रेड्डी यांच्याकडे रजेचा अर्ज दिला होता. तो मंजूर झाला नाही. तरीही यलगुलवार पंधरा दिवसापासून ते रजेवर आहेत. पाण्याची पातळी पाहून जर पंप चालू केला असता तर कदाचित ही मोटार जळाली नसती.

भवानी पेठ पाणी गिरणी येथे पाण्याचे पंप दुरूस्ती चे काम सुरू
^संतोष यलगुलवार हे मंजुरी नसताना रजेवर गेले. पाणीपुरवठ्याचे अधिकारी मला विचारल्याशिवाय रजा घेऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पाण्याची गैरसोय सहन करणार नाही. मोटार जळाल्याचा अहवाल मागवला आहे.” विजयकुमार काळम पाटील, आयुक्त,महापालिका
बातम्या आणखी आहेत...