आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे ते दौंड प्रवासी गाड्या धावणार विद्युत इंजिनवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुणेदौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून मुख्य संरक्षक आयुक्तांनी पाहणी करून या मार्गावरून विद्युत इंजिन धावण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारपासून मालगाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० दिवसांत प्रवासी गाड्याही विद्युत इंजिनवर धावू लागतील.
विद्युत इंजिनवर गाड्या धावणार असल्याने पर्यावरणाचे संरक्षण होईल. प्रवासाच्या वेळेत किमान ते मिनिटांची बचत होणार आहे. या विद्युतीकरणाचा सर्वात जास्त फायदा पुणे आणि मनमाडकरांना होणार आहे. या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना आता इंजिन बदलण्याची गरज भासणार नाही. यामुळे प्रवासी गाड्यांची किमान २० ते २५ मिनिटांची बचत होईल.

सोलापूर रेल्वे विभागात रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे दुहेरीकरणाचे काम गेल्या ते वर्षापासून सुरू आहे. मनमाड ते दौंड दरम्यानच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागला. दुसऱ्या टप्प्यात दौंड ते भिगवण दरम्यानच्या विद्युतीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच महिन्यात हे कामही पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल आता दौंडपर्यंत येणार
दररोज पुणे ते लोणावळा दरम्यान ६० हून अधिक लोकल धावतात. दौंडपर्यंत विद्युतीकरण झाल्याने लोणावळा येथून पुण्याला येणाऱ्या गाड्या आता थेट दौंडपर्यंत येतील. त्यामुळे सोलापूरकरांना लोणावळ्याला जायचे असल्यास थेट दौंडहून लोकलद्वारे लोणावळ्याला जाता येईल.

^दौंडपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या माल गाड्या विद्युत इंजिनवर धावत आहेत. येत्या ते १० दिवसांत प्रवासी गाड्याही विद्युत इंजिनवर धावतील.'' मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक
बातम्या आणखी आहेत...