आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत पुणे-नागपूरदरम्यान धावणार पहिली क्लोन ट्रेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे-नागपूरदरम्यानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीत तुमचे आरक्षित तिकीट कन्फर्म नाही झाले तरी अजिबात चिंता करू नका. कारण मध्य रेल्वे प्रशासन पुणे-नागपूरदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी ‘क्लोन ट्रेन’ सोडण्याच्या तयारीत आहे.

ज्या रेल्वेगाडीस वेटिंगची संख्या सहाशेहून अधिक जाईल त्या गाडीस पर्यायी गाडी म्हणून ही जादा गाडी (क्लाेन ट्रेन) साेडण्यात येईल. रेल्वे बोर्डाने यापूर्वीच अशी जादा गाडी चालविण्यास मंजुरी दिली असून यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, सिकंदराबाद कोलकाता या मार्गांचा समावेश अाहे.
मध्य रेल्वेतील पुणे नागपूर हे दोन महत्त्वाचे विभाग आहेत. या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक असली तरीही दिवाळीच्या काळात सर्वच रेल्वेगाड्या खचाखच भरून धावतात. त्यामुळे प्रवाशांच्या साेयीसाठी अाता ज्या गाडीला वेटिंगची संख्या अधिक असेल ती गाडी गेल्यानंतर त्याच मार्गावर एका तासात दुसरी रेल्वे साेडणार अाहेत.

रेल्वेलाही फायदेशीर
वेटिंग प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या जादा गाडीला डबे जोडण्यात येतील. यामुळे वेटिंगवर असलेल्या प्रवाशांची सोय होईल, शिवाय रेल्वेलाही तिकिटाच्या रकमेचा परतावा द्यावा लागणार नाही. यासाठी रेल्वे प्रशासन नवीन रेकचा वापर करणार आहे. मूळ गाडी गेल्यानंतर एक तासाच्या आतच ही ‘क्लोन ट्रेन’ धावणार असल्याने प्रवाशांना नियाेजित गावी जाण्यासाठी फार उशीरही हाेणार नाही.

प्रस्ताव मुख्यालयाकडे, पीटलाईननुसार मंजुरी
> दिवाळी सुट्यातप्रवाशांची संख्या माेठी असते. हे लक्षात घेऊन अाम्ही २८ ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत नागपूर-पुणेदरम्यान क्लोन ट्रेन साेडण्याची मागणी मुख्यालयाकडे केली अाहे. त्यानुसार चाचपणी केली जात आहे. पुण्यात पीटलाइनच्या क्षमतेचा उपस्थित रेकचा विचार करूनच याला मंजुरी मिळणार आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास ही मध्य रेल्वेतील पहिली क्लोन ट्रेन ठरेल. ब्रिजेशकुमारगुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर, मध्य रेल्वे.
ट्रॅव्हल्स चालकांकडून हाेणारी लूट थांबणार
दिवाळीच्या काळात पुणे-नागपूरदरम्यान प्रवाशांची संख्या माेठ्या प्रमाणावर असते. ज्या प्रवाशांचे रेल्वेे तिकीट आरक्षित होत नाही ते प्रवासी पर्यायी वाहतूक म्हणून खासगी बसचा वापर करतात. या मार्गावर जवळपास ६० ते ६५ ट्रॅव्हल्स दरराेज धावतात. दिवाळीच्या काळात हे खासगी वाहतूकदार एका प्रवाशाकडून ते हजार रुपये उकळतात. क्लोन ट्रेन धावल्यास प्रवाशांची ही अार्थिक लूट थांबेल.
बातम्या आणखी आहेत...