आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब बँक फसवणूकप्रकरणी एकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणी एकास अटक झाली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अहमद मुस्तफा सगरी असे त्याचे नाव आहे. बँकेस बनावट कागदपत्रे देऊन ७२ जणांनी वाहनकर्ज घेतले. एकूण कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. यावरून वाहन एजंटांसह ७२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
युनिक मोटर्सचे सब डीलर सगरी यास अटक झाली. अन्य संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहेत. या प्रकरणामध्ये अजून किती जण सहभागी आहेत. असे प्रकार कुठल्या कुठल्या बँकेत घडले आहेत, आदी प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. व्यवस्थापक राकेश शर्मा यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

विजापूरनाका येथे दाखल प्रकरणावर पडतेय धूळ
विजापूरनाका पोलिस ठाणे येथे अशाच प्रकारचा गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता. या प्रकरणात काही जणांना अटकसुद्धा झाली होती. या प्रकरणात मार्केट यार्ड येथील बॅँकेतून कर्ज घेण्यात आले होते. याबाबतीत पोलिस ठाण्यात विचारले असता अजून तपास सुरू आहे, अशीच उत्तरे त्यावेळी देण्यात आली होती. काहीच प्रगती नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

सर्वांची चौकशी
^डिलरआणिसब डिलर यांना अगोदर ताब्यात घेतले जात आहे. एकास अटक झाली. उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली ओहत. लवकरच सर्वांना ताब्यात घेऊ. हा प्रकार मोठा असून यामध्ये डिलर, सब डिलर, वाहन खरेदीदार, बॅँक आणि आरटीओच्या काही कर्मचाऱ्यांचाही तपास होईल.alt148 शर्मिष्ठाघारगे, सहायक पोलिस आयुक्त
दोघांचा शोध सुरू, बनावट कागदपत्रांवर घेतले कर्ज
बातम्या आणखी आहेत...