आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सैराट’मधील विहीर कुठे आहे...? विद्यार्थ्यांचे एकच उत्तर करमाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिभाई प्रशालेत इंट्याकच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. - Divya Marathi
हरिभाई प्रशालेत इंट्याकच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सोलापूर- ऐतिहासिक वारसा असलेल्या पुरातन इमारतींची विद्यार्थ्यांना आेळख व्हावी, त्याच्या जतनाचे धडे मिळावेत, या उद्देशाने ‘इंट्याक’च्या वतीने मंगळवारी ‘इंडिया हेरिटेज क्वीझ २०१७’ ही परीक्षा झाली. तीत देश आणि स्थानिक स्तरावरील २० प्रश्न होते. त्यातील अचूक उत्तराचा एकच प्रश्न होता- ‘सैराट सिनेमात दिसणाऱ्या पायऱ्यांची विहीर सोलापूर जिल्ह्यात कुठे आहे?’ विद्यार्थ्यांचे एकच उत्तर-करमाळा... 

हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात सकाळी ही परीक्षा झाली. ऐतिहासिक ठिकाणे, कला-नृत्य क्षेत्रातील संस्था, घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर या नाटकांचे लेखक आदी विषयांवरील प्रश्न होते. पहिलाच प्रश्न अतिशय अवघड होता- ‘९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनऊजवळच्या कोणत्या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान यांनी पंजाब मेल लुटली?’ अशा पद्धतीचे ते १५ प्रश्न विद्यार्थ्यांना डोके खाजवणारे होते. १६ ते २० क्रमांकाचे प्रश्न मात्र सोलापूरशी संबंधित होते. ते सोडवताना विद्यार्थ्यांचा चेहरा ‘फटक्यात झालं’ हेच सांगत होता. इंग्रजी आणि मराठीतून हे प्रश्न विचारले होते. दोन्ही माध्यमांच्या मुलांनी त्यात सहभाग घेतला होता. 

या परीक्षेसाठी १६ शाळांतील ६२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात वि. मो. मेहता, ज्ञानप्रबोधिनी, एसव्हीसीएस, एस. आर. चंडक, हरिभाई देवकरण प्रशाला, केएलई, जैन गुरुकुल, दमाणी, इंडियन मॉडेल स्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. वास्तुरचनाकार सीमंतिनी चाफळकर, पुष्पांजली काटीकर, श्वेता कोठावळे, नितीन अणवेकर, मसाई चाटला, सविता दीपाली, भक्ती परळीकर, राखी खरबस, ऋतुराज कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. उद्योजक गोवर्धन चाटला यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 
 
दिंडुरे, अथर्व प्रथम 
यापरीक्षेतील विजेते असे : अथर्व दिंडुरे, नंदन गंभीर (प्रथम), स्वराज देशमाने, समृद्धी दरक (द्वितीय), साक्षी कस्तुरे, प्रीती चव्हाण (तृतीय), पुरव बियाणी, केतकी सुर्डीकर (चौथे). या सर्वांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...