आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा.नां.च्या स्मृतींना संगीतमय उजाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वर्गीयकवी रा. ना. पवार यांच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना संगीतमय उजाळा देण्याची योजना त्यांच्या मित्रपरिवाराने आखली आहे. त्यांच्या कवितांना स्वतंत्र चाली लावून गीतांच्या रूपात सादर करण्यात येणार आहे. रानांच्या असंख्य दुर्मिळ आठवणी, गाजलेल्या कविता यातून त्यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. त्यांचे चिरंजीव माधव पवार यांच्या कवितांचाही समावेश यात असेल. रा. ना. पवार मित्रपरिवाराने स्वखर्चाने हा कार्यक्रम करायचे ठरवले आहे. बुधवारी (दि.२९) रा. ना. पवार यांचा जन्मदिवस आहे.
रा. ना. पवार प्रतिष्ठान शिवरंजनीच्या कलावंतांनी संगीतमय कार्यक्रमाची संकल्पना माधव पवार यांच्या पुढ्यात मांडली. गेले महिनाभर यावर काम करत गीतांना स्वतंत्र चाली बांधल्या आहेत. गीत, संगीत कविता आणि त्यांच्या सहवासातील काही दिग्गजांच्या मुलाखती असे अनोखे मिश्रण या माहितीपटात केल्याचे दिग्दर्शक उन्मेष शहाणे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रा.नां.च्या उघड नयन देवा, देवा बोला हो माझ्याशी, सावळ्या विठ्ठला, नका विचारू देव कसा आदी अनेक गाजलेल्या गीतांचा समावेश करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बुधवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. किर्लोस्कर सभागृहात होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

हे आहेत किमयागार
समीररणदिवे, उन्मेष शहाणे, उमेश मोहोळकर, विश्वास शाईवाले, निवेदक माधव देशपांडे, सुहास सदाफुले, निखिल भालेराव, वीणा बादरायणी, वैष्णवी शाईवाले, शर्वरी कुलकर्णी, संज्योत कुलकर्णी, समीत येवलेकर, बाबूराव भोसले, राहुल रणशृंगारे.

माझे वडील रा. ना. यांच्या कवितांना गीतांच्या रूपात सादर करण्याचे शिवरंजनीच्या कलावंतांनी ठरवले. त्याने मला खूप आनंद झाला आहे. अनेकांचे सहकार्य, कलावंताचे प्रेम यातून हा कार्यक्रम बहरणार. ते पाहण्यासाठी मी आतूर आहे. माधवपवार, कवी