आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाज सेंटरवरील छाप्यात आठ तरुण-तरुणी ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सातरस्ता येथील सेव्हन वेज मसाज सेंटरमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला. एका परप्रांतीयासह चार तरुणी चार तरुणांना पोलिसांनी पकडले. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहराच्या मध्यवर्ती भागातील सात रस्ता येथे स्वप्नजा अनुज शर्मा अनुज शर्मा यांच्या नावाने ती जागा असून, तेथे सेव्हन वेज मसाज सेंटर आहे. याठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता बनावट ग्राहक पाठवून सहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने छापा टाकला. मिझोरामच्या एका मुलासह चार तरुण चार तरुणी सापडल्या. यातील एक मुलगीही मिझोरामची आहे. पोलिसांनी रजिस्टर, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले.

परप्रांतीयाचा सहभाग
मुलीपुरवणारा मिझोरामचा एजंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मागील महिन्यात परदेशातील तरुणी आली होती असे सांगण्यात आले. हायप्रोफाईल परिसरात, गुपचूप अवैध व्यवसाय सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

असा टाकला छापा
माहितीमिळाल्यावर एक बनावट ग्राहक तयार करण्यात आला. त्याने तेथे फोन करून मुली आहेत का? अशी विचारणा केली. तीन दिवसांनी या असे सांगण्यात आले. मला आजच यायचे आहे, असा आग्रह धरल्यानंतर मसाज सेंटरमधून येण्याची सूचना मिळाली. पोलिसांनी गाडीचा दिवा काढून छापा टाकला.