आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर अर्बन बँकेवर छापा; निनावी लॉकर्समध्ये सापडल्या जुन्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर, पंढरपूर - नोटबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयावर शुक्रवारी छापा टाकला. बँकेच्या बाहेर पोलिस तैनात करून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ तासांहून अधिक काळ बँकेचे लॉकर्स, जनधन खात्यामध्ये जमा झालेली रक्कम, नोव्हेंबरनंतर जमा झालेल्या नोटा आदींची तपासणी मोजदाद केली. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने कुणालाही दिलेल्या काही लॉकर्समध्ये जुन्या नोटा आढळून आल्याचे वृत्त असून त्याची पडताळणी केली जात आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागाने देशभरात छापासत्र सुरू केले आहे. शुक्रवारी राजस्थानमध्ये अॅक्सिस बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. इकडे महाराष्ट्रात पंढरपुरातील सर्वात जुन्या पंढरपूर अर्बन बँकेवर छापा टाकला. कोल्हापुरातील अधिकाऱ्यांच्या पथकाने बँकेतील अधिकाऱ्यांचे फोन काढून घेतले. बँकेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. नोटा बदलून देण्याच्या किंवा नोंदीत नसलेला पैसा बँकेतून नोंदीत अाणला जातोय का? या संदर्भात तपासणी करण्यात आली. या पथकात तीन अधिकारी अाणि पाच कर्मचारी असे आठ जण होते, असे सांगण्यात अाले. ही तपासणी चालू असताना बँकेत अन्य कोणालाही अात जाऊ दिले जात नव्हते. तपासणी करण्यासाठी अालेल्या पथकात पुणे, अहमदनगर, कोल्हापूर येथील अधिकारी, कर्मचारी सहभागी होते, असे सांगण्यात अाले.

लाॅकर्सचीही तपासणी : अायकरविभागाच्या या पथकाने बँकेतील लाॅकर्सचीही तपासणी केली. यात कोणाच्याही नावे कागदोपत्री लाॅकर नसताना त्यातही रकमा असल्याचे अाढळून अाल्याची चर्चा होती. त्यात किती रकमा अाढळल्या, नोटा जप्ती केली काय? या बाबतची माहिती देण्यास सूत्राने नकार िदला.

नोटाबंदीनंतर उमरगा येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या लोकमंगल मल्टिस्टेटचे ९१ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. हे प्रकरणही आयकर विभागाकडे तपासणीसाठी आहे. त्यानंतर सोलापूर शहरात बुधवारी रात्री एका वाहनातून सहा लाख रुपये जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

ही तर नियमित तपासणी
^अामच्या बँकेची‘अारबीअाय’कडून नेहमीच तपासणी केली जाते. नोटा बदलाच्या निर्णयानंतर अायकर विभागाने तपासणी केली. सर्वच बँका तपासल्या जाणार अाहेत. मोठी बँक असल्याने अगोदर तपासणी झाली. तसे अाम्ही दररोज सकाळी बँक व्यवहाराची माहिती अारबीअायला कळवतोच. नोव्हेंबरपासूनचे व्यवहार तपासले गेले. आमदारप्रशांत परिचारक, चेअरमन, पंढरपूर अर्बन बँक
बातम्या आणखी आहेत...