आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरदा रेल्वे अपघातामुळे तब्बल ३२ रेल्वेगाड्या रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खंडवाते इटारसी दरम्यान जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वेट्रॅक वाहून गेला. त्यामुळे हरदा येथे दोन रेल्वेचा भीषण रेल्वे अपघात झाला. यात रेल्वेचेे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकावरून उत्तर रेल्वेशी जोडणाऱ्या सुमारे ३२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ते १० ऑगस्टदरम्यान विविध महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा यात समावेश आहे.
कर्नाटक एक्स्प्रेस, पुणे-पटणा एक्स्प्रेस, निजामुद्दीन -वास्को- गोवा एक्स्प्रेस, पुणे -जम्मुतावी झेलम एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. या गाड्या जळगाववरून भोपाळ मार्गे जाता पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरून जळगावहून सुरत, मथुरा मार्गे दिल्लीला पोहोचणार आहेत.
रद्द झालेल्या गाड्या
साईनगर-कालका, निजामुद्दीन -यशवंतपूर, म्हैसूर -निजामुद्दीन, पुणे-जम्मुतावी झेलम, पुणे -गाेरखपूर, पुणे-नागपूर, यशवंतपूर -चंदीगड, बनारस -म्हैसूर, पुणे -न्यू अमरावती, दरभंगा-पुणे, पुणे-पटणा, कोल्हापूर - नागपूर- कोल्हापूर, पुणे-लखनऊ आदी प्रमुख गाड्या रद्द झाल्या आहेत.
आता ‘केके’चा मार्ग असा
कर्नाटकएक्स्प्रेस (केके) झेलम एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन गाड्यांचा मार्ग १० ऑगस्टपर्यंत बदलण्यात आला. ही गाडी जळगाववरून सुरत, नागदा, सवाईमाधवपूर मार्गावरून मथुरेला पोहोचेल. हा मार्ग पश्चिम रेल्वेचा अाहे. गाडी मथुरेला पोहोचल्यानंतर तिच्या नेहमीच्या मार्गाने दिल्लीला पोहोचेल. जाताना-येताना हाच मार्ग असणार आहे. त्यामुळे दोन्ही गाड्या नेहमीच्या म्हणजेच भुसावळ, मनमाड, इटारसी, भोपाळ आदी मार्गांवर थांबणार नाहीत.
मार्गात बदल
ट्रॅकवाहून गेल्याने मार्ग बदलण्यात आला आहे. यात सोलापूर विभागावरून जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. १० ऑगस्टपर्यंत ही स्थिती राहील.'' के.व्ही. थॉमस, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर