आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे डिझेल इंजिनमध्ये ‘त्रिनेत्र’, तीन किमीपर्यंतचा मार्ग टप्प्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे रुळाला तडे जाणे तसेच रुळावर एखादी वस्तू असणे आदी कारणांमुळे देशात रेल्वे अपघात घडले आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आता तिसऱ्या डोळ्याची मदत घेणार आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र ही स्थिती वास्तवात येणार आहे. रेल्वेचालकास रुळांवरील पुढील दोन ते तीन किमी अंतरावरचा मार्ग दिसावा, यासाठी प्रशासनाने त्रिनेत्र नावाचे उपकरण विकसित केले आहे.
याद्वारे रेल्वेचालकास रुळाला जर तडे गेेले असतील तर अथवा रुळावर माइलस्टोन किंवा वाहने आढळून आली तर तो तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून रेल्वे थांबवू शकेल. त्रिनेत्रच्या माध्यमातून त्याला दोन ते तीन किमी अंतरावरची माहिती सहज मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे अपघात टाळण्यासाठी व मानवरहित लेव्हल क्रॉसिंग गेटवरील अपघात रोखण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने अपघात घडू नये म्हणून कंबर कसली आहे. यासाठीच त्रिनेत्र उपकरणाचा वापर केला जाणार आहे. लखनऊ येथील रेल्वेच्या आरडीएसओ संस्थेने हे उपकरण तयार केले आहे. डिझेल इंिजनमध्ये हे उपकरण बसवण्यात येईल. ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून हे उपकरण काम करेल. याचा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा उपयाेग होऊ शकतो.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संशोधन कार्य
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपकरणांचा शोध लावून ते वापरात आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्रिनेत्रदेखील त्याचाच भाग आहे. प्रायोगिक स्वरूपात १०० इंजिनांमध्ये याचा वापर केला जाईल.
विपुल कुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, आरडीएसओ, लखनऊ, उत्तर प्रदेश.
जगातील सहा देशांकडून या तंत्रज्ञानाचा वापर
रुळावर जर काही गडबड झाली तर हे उपकरण चालकास लाल रंगाचा दिवा दाखवेल. त्यामुळे पुढे काही तरी धोका असल्याची माहिती चालकास मिळेल. त्यामुळे गाडी थांबविणे सहज शक्य होईल. आपत्कालीन ब्रेक लावल्यानंतर चारशे ते पाचशे मीटर अंतरावर रेल्वे थांबेल. जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंडसह जगातील सहा देशांमध्ये या प्रणालीचा वापर केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...