आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवासात प्रवासी चाखू शकणार वेगळ्या लज्जतदार पदार्थांची चव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेत प्रवासी नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळतात. नेहमीच्या खाद्यपदार्थांना फाटा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ‘आयआरसीटीसी’ने फूड ऑन ट्रॅकचा विस्तार करत वेगवेगळे पदार्थ चाखता यावेत म्हणून ‘फुडपांडा’शी करार केला आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यात प्रवाशांना प्रवासात लज्जतदार पदार्थांची चव चाखणे शक्य होणार आहे.

आयआरसीटीसीने यासाठी देशातील सुमारे १०० प्रमुख रेल्वे स्थानकांची निवड केली आहे. या स्थानकावर गाडी येण्याच्या दोन तासांपूर्वी जेवणाची ऑर्डर देणे गरजेेचे आहे. गाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या बर्थवर ऑर्डर केलेले पदार्थ दिले जाणार आहे. याची सुरुवात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून लवकरच सुरू होणार आहे. यानंतर देशातील विविध रेल्वे स्थानकावर ही सुविधा दिली जाईल.

मध्य रेल्वे विभागात ही सुविधा मुंबई, पुणे नागपूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला प्रमुख शहरामधून ही सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर तिचा देशभर विस्तार केला जाणार आहे.

‘फुडपांडा’च्या माध्यमातून जेवण हवे असल्यास ऑनलाइन तिकीट काढताना जेवणाची रक्कम भरता येईल किंवा रेल्वेत खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यानंतरही आपण त्याचे पैसे देऊ शकता. यासाठी आयआरसीटीसीने त्यांचा टोल फ्री नंबर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला आहे. १८०० -१०३४-१३९ या क्रमांकावर फोन करून आपला पीएनआर नंबर सीट क्रमांक दिल्यास आपल्या सीटवर जेवण खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाईल.

प्रवाशांना प्रवासातचांगले विभिन्न अन्न पदार्थ मिळावेत म्हणून फुडपांडाशी करार करण्यात आला आहे. भविष्यात केएफसी, डोमिनोज अशा कंपन्यांशी देखील करार करून प्रवाशांची सोय केली जाणार आहे. डॉ. ए. के. मनोचा, आयआरसीटीसी अध्यक्ष, नवी दिल्ली