आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानकावर समस्या अाल्यास भेटा रेल्वेस्टेशन डायरेक्टरला, स्थानकाचे सर्वाधिकार देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवेदिता सराफ यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान उंदराने त्यांची पर्स कुरतडली. टॉयलेटच्या अस्वस्छतेने त्या त्रस्त झाल्या. - Divya Marathi
निवेदिता सराफ यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान उंदराने त्यांची पर्स कुरतडली. टॉयलेटच्या अस्वस्छतेने त्या त्रस्त झाल्या.
सोलापूर - प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या मनात रेल्वेविषयी चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला अाहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रवाशांना स्थानकावर येणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी त्या साेडवण्यासाठी स्टेशन डायरेक्टर या नव्या वरिष्ठ पदाची नेमणूक केली जात अाहे. यांनाच मिनी डीअारएम म्हणूनही संबाेधले जाईल. पहिल्या टप्प्यात देशातील वन दर्जाच्या ७५ रेल्वे स्थानकावर हा प्रयोग राबविला जाणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकताच रेल्वे प्रवासाचा वाईट अनुभव आला होता.
ज्याप्रमाणे विभागाचा प्रमुख म्हणून ‘डीआरएम’ काम करतात त्याचप्रमाणे ‘स्टेशन डायरेक्टर’ हे स्थानकाचा प्रमुख म्हणून काम करेल. स्थानकावरील सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांचे थेट नियंत्रण असेल. एकीकडे प्रवाशांच्या तक्रारी वाढत असताना डीआरएम यांना कामाच्या व्यापामुळे स्थानिक प्रश्नांकडे लक्ष ठेवणे अवघड जात हाेते. यातून ताेडगा काढण्यासाठी हे नवे पद नेमण्यात अाले. मात्र त्यांचे अधिकार केवळ संबंधित स्थानकापुरतेच राहतील.
पहिल्या टप्प्यात देशातील १२ स्थानकांवर स्टेशन डायरेक्टर नेमण्यात येतील. यात नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स मुंबई, जुनी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हावडा, जयपूर, भोपाळ, अहमदाबाद, आदी प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. उर्वरित ६३ स्थानकावर डिसेंबर अखेरीस नियुक्ती केली जाईल. यात मध्य रेल्वेचे पुणे, सोलापूर , नागपूर, भुसावळ, आदी प्रमुख स्थानकांचा समावेश असेल.

जबाबदारी काय?
स्टेशनमॅनेजर हे रेल्वे स्थानकाचे प्रमुख असतात. त्यांच्याकडे गाड्याच्या परिचालनाची जबाबदारी असते. अन्य कर्मचारीही कार्यालयीन कामात व्यग्र असतात. त्यामुळे स्थानकावरील सर्वच बाबींवर नियंत्रण ठेवणे त्यांना शक्य हाेत नाही. अशा वेळी स्टेशन डायरेक्टर हे गाड्याच्या परिचालनासाेबतच, स्थानकावरील स्वच्छता, पार्सल, तिकीट बुकिंग, आरक्षण कार्यालय, तिकीट चेकिंग आदी कामांवर नियंत्रण ठेवतील. स्थानकावरील सर्व विभागाच्या निरीक्षकांवर त्यांचे नियंत्रण असेल.
नेमके काय घडले?

निवेदिता सराफ या नाटकासाठी लातूर एक्स्प्रेसने लातूरला जात होत्या. एसी सेकंड क्लासने त्यांचा प्रवास सुरु होता. प्रवासादरम्यान त्यांनी आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती. मात्र चक्क उंदराने या पर्सकडे धाव घेऊन ती कुरतडून टाकली. लातूर स्टेशनवर उतरत असताना, पर्स पाहिल्यानंतर निवेदिता सराफ यांच्या हा प्रकार लक्षात आला. सध्या उंदरांमुळे बरेच आजार बळावत आहेत. कदाचित पर्सऐवजी उंदरांनी माझे केस कुरतडले असते किंवा माझ्या चेह-याला इजा झाली असती, अशी संतापजनक प्रतिक्रिया निवेदिता सराफ यांनी वृत्तवाहिनीद्वारे दिली.
बातम्या आणखी आहेत...