आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या लोहमार्गासाठी रेल्वे घेणार 'इस्त्रो'ची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेचा नवा लोहमार्ग टाकायचा असेल अथवा नवा जलमार्ग शोधायचा असेल तर संबंधित प्रशासनाला जागा मार्ग शोधण्यासाठी भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) मदत करणार आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालय इस्त्रो या संस्थांत करार झाला असून नव्या लोहमार्गासाठी उपग्रहांची मदत घेण्याचे ठरले आहे. देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर देखील याचा वापर केला जाणार आहे.

'इस्त्रो'च्या उपग्रहाद्वारे रेल्वे प्रशासन नवा लोहमार्ग टाकताना कोणता मार्ग जवळचा ठरू शकतो. मार्गातील भाैगोलिक स्थिती, जमिनीची स्थिती कशी आहे याचा उपग्रहाद्वारे छायाचित्र मिळवणार आहे. छायाचित्रांचा अभ्यास करून रेल्वे प्रशासन पुढची दिशा ठरवणार आहे.
इस्त्रो ही छायाचित्र रेल्वेस उपलब्ध करुन देणार आहे. तसेच देशातील रस्ते वाहतुकीसाठी जल वाहतुकीसाठी देखील इस्त्रोची मदत घेतली जाणार आहे. इस्त्रोच्या मदतीमुळे अचूक काम होण्यास मदत मिळणार आहे. तसेच नेमकी भाैगोलिक स्थिती कशी आहे ती देखील लक्षात येण्यास मदत मिळणार आहे.

कामे मार्गी लागतील
रेल्वे प्रशासन आणि इस्त्रो यांच्यात नुकताच करार झाला आहे. उपग्रहाच्या मदतीने रेल्वे आपल्या मार्गाची कामे पार पडणार आहे. रेल्वे वाहतुकीसाठी देखील हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. नरेंद्र पाटील, मुख्यजनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.
बातम्या आणखी आहेत...