आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे अारक्षण तिकीट कॅशलेस, स्थानकावर पॉस मशीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेप्रवाशांसाठी सोलापूर स्थानकावर कॅशलेस सुविधा उपलब्ध झाली अाहे. आरक्षण केंद्रावर मंगळवारी सकाळी तीन पॅास मशीन बसविण्यात आले अाहेत. प्रवाशांना एटीएम, डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करून आरक्षित तिकीट काढता येईल. सोलापूर रेल्वे विभागात ३९ पॉस मशिन बसविण्यात येतील. सुरुवातीला आरक्षण केंद्रावर हे मशीन उपलब्ध असतील. नंतर चालू तिकीट खिडक्यांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल. यासाठी काही काळ प्रवाशांना वाट पाहावी लागेल.
^स्थानकावर पॉसप्रणाली कार्यान्वित करण्यात आली.विभागातील एकूण ३९ मशीन बसविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.'' - मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्तविभागीय रेल्वे व्यवस्थापक.
बातम्या आणखी आहेत...