आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढ्यात १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा - तालुक्यातसलग सात दिवसांपासून कमी प्रमाणात पडत असलेल्या भिज पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाला जरी जीवदान मिळाले असले, तरी म्हणावा असा जोरदार पाऊस या तालुक्यात पडलेला नाही.
मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नसल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या ओढे, तलावात पाणीसाठा साचलेला नाही. कोणतेही तलाव, ओढे, सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी साठलेले नाही.

या पावसाने विहिरींची अडीच फुटाने पाणी पातळी वाढली आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत माढा तालुक्यातील शेतकरी आहेत. जोराचा पाऊस झाल्याने जलयुक्त शिवारच्या ओढे, तलावात पाणी साठले नाही. त्यामुळे आकडेवारी कृषी विभागाकडून मिळाली नाही.
माढा तालुक्यातसलग सात दिवसांपासून कमी प्रमाणात पडत असलेल्या भिज पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाला जरी जीवदान मिळाले असले, तरी म्हणावा असा जोरदार पाऊस या तालुक्यात पडलेला नाही.

मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नसल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या ओढे, तलावात पाणीसाठा साचलेला नाही. कोणतेही तलाव, ओढे, सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी साठलेले नाही.

या पावसाने विहिरींची अडीच फुटाने पाणी पातळी वाढली आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत माढा तालुक्यातील शेतकरी आहेत. जोराचा पाऊस झाल्याने जलयुक्त शिवारच्या ओढे, तलावात पाणी साठले नाही. त्यामुळे आकडेवारी कृषी विभागाकडून मिळाली नाही.
मंगळवेढा महाराष्ट्रशासनाने राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला मंगळवेढा तालुक्यात चांगले परिणाम दिसून येत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असून, मंगळवेढा तालुक्यात सरासरी ६७.८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच १३१०३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

या वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १०.४७ लाख घनमीटर गाळ लोकसहभागात काढण्यात आला. याची किंमत ७८५.६६ कोटी एवढी आहे. तर शासकीय खर्चातून ६० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्याचे मूल्यांकन ४५ लाख आहे. तालुक्यात प्रत्यक्षात निर्माण झालेला पाणीसाठा १३१०३ टीसीएम आहे. शिवाय १३१०३ हेक्टर क्षेत्र जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनाखाली आले आहे. तालुक्यातील कृषी विभागाकडे शेततळ्यांसाठी ७७५ अर्ज आले होते. १९६ शेततळ्यांचे उद्दिष्ट चालू वर्षासाठी देण्यात आले आहे.
सांगोला सांगोलाशहर परिसरात आज पहाटे सायंकाळी चार वाजता साधारण पाऊस झाला. आज आठवडा बाजार असल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला. गेला आठवडाभर सतत ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस हलक्या सरी पडत आहेत. पण तालुक्यातील सर्व प्रकल्प कोरडेच आहेत.

लहान पावसामुळे रानातील तन तसेच शहरी भागात काटेरी वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागात डासाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे शहरात रोगराई वाढली आहे. फळबागावरील रोगराई वाढली आहे. शेतकरी फवारणीमुळे मेटाकुटीस आला आहे. अनेक रस्ते चिखलमय झाल्याने शहरातील मेडशिंगी, एकतपूर, चिंचोली, कडलास, मिरज, पंढरपूर हे रस्ते तसेच शहराशेजारील वसाहती चिखलमय झाल्या आहेत. सिध्दार्थ वसाहत, भीमनगर येथे अनेक नागरिकांच्या घरासमोर मैलामिश्रित पाणी उभारल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...