आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या दिवशीही रिपरिप, उखडले रस्ते अन् भरले खड्डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आेढ दिलेल्या पावसाचे चार दिवसांपूर्वी आगमन होऊन ताे प्रत्येक दिवशी बरसला. गुरुवारी चौथ्या दिवशी त्याची रिपरिप सुरूच असल्याने रस्ते उखडून खड्डे पाण्याने भरले. काही ठिकाणी चारचाकी वाहने फसली, रिक्षा अडकून पडल्या.

पावसाच्या रोज सायंकाळच्या नित्य हजेरीने नोकरदारांची तारांबळ उडाली. सखल भागातील झोडपट्टीवासीयांची पंचाइत झाली आहे. काही घरात पाणी शिरल्याने धांदल उडाली. हद्दवाढ भागातील अनेक वसाहतींमध्ये चिखल झाला. दुचाकीस्वारांना ये-जा करणे कठीण झाले. छोटे खड्डे खोलवर गेले.

या मोसमात पडलेला गुरुवारपर्यंतचा पाऊस मि.मी.त
उत्तर सोेलापूर १७७.५६, दक्षिण सोलापूर १४२, बार्शी १६३.६४, अक्कलकोट १६६, मोहोळ १२६.४७
जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात यंदाच्या वर्षीचा सर्वाधिक २१.७३मि.मी. इतका पाऊस झाला. माळशिरस वगळता सर्वच तालुक्यात १२५ते १६० मि.मी. इतका पाऊस झाला आहे. मागील वर्षी १०सप्टेंबरअखेर३३०मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

गुरुवारी दुपारी पावसाची चिन्हे नव्हती. सायंकाळी पाचला अचानक ढग भरून येऊन धो-धो पाऊस झाला. पाच ते सातपर्यंत संततधार सुरू होती. त्यामुळे विद्यार्थी आणि नोकरदारांची तारांबळ उडाली. बस, रिक्षा गाठण्यासाठी धावाधाव झाली. अनेक दिवसांपासूनच्या अडगळीतील छत्र्या उघडल्या गेल्या. अंगावर रेनकोट घातलेली मंडळी बाहेर पडली. त्यामुळे आता कुठे पावसाळा सुरू झाल्याचे चित्र दिसले.