आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईतील वरदा वादळामुळे सोलापुरातही पावसाने लावली हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिणेकडीलवरदा वादळाचा परिणाम सोलापुरातही जाणवत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या सरी शहर लगतच्या परिसरात बरसल्या. सकाळी साडेअकरा ते बाराच्या पाऊस पडला. ०.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमानात िकंचित घट नांेदली गेली. पर्यावरणीय दृष्टीने या पावसाचा काही फायदा, तोटा नाही. चक्रीवादळाच्या परिणामामुळे असा पाऊस प्रभाव कक्षेनुसार कमी जास्त प्रमाणाात पडतो, असे मत विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केले.
दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. अक्कलकोट, बार्शी मोहोळ तालुक्यात रिमझिम पडला. माळशिरस तालुक्यात तुरळक सरी पडल्या. उर्वरित तालुक्यात ढगाळ वातावरण दाटून आलेले दिसले. बाजार समितीत बुधवारी ३५९ ट्रक कांदा आला. पावसाचे वातावरण पाहून कांदा सुरक्षित ठेवण्यात आला होता. त्यामुळे नुकसान झाले नाही. मात्र, बांधावर असलेला कांदा काही प्रमाणात भिजला. तुरीची रास खोळंबली गेली.
पाऊस उपयुक्त, गरजेचा
पाऊसअपेक्षितअसाच होता. आपला जिल्हा रब्बीचा. यंदाचे ला निनो हे वर्ष आहे. आता पाऊस गरजेचा होता. ज्वारी हरभरा पिकांना लाभ होईल. थंडी वाढल्यानंतर गव्हालाही याचा लाभ मिळेल. उजनीने जिल्ह्याचा क्रॉपिंग पॅटर्न बदलला असल्याने आपण भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष या पिकांच्या अनुषंगाने फायदा -तोटा पाहतो. हा पाऊस इतका कमी पडला की मोजताही आलेला नाही. सर्वसाधारणपणे २.५ मिमीपेक्षा जास्त पडला तर तो पावसाचा दिवस मानला जातो.'' डॉ.जे. डी. जाधव, हवामान तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...