आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray In Solapur, Help To Drought Hit People

राज ठाकरे सोलापुरात, दुष्काळग्रस्तांना मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहा दिवसांसाठी राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर निघालेले मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे बुधवारी सोलापुरात दाखल झाले. मराठवाड्यातील काही भागांचा दौरा करून सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन झाले. सोलापूरचा दौरा दोन दिवसांचा आहे. यावेळी मनसेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १० कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तर तीन महिला विडी कामगारांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना ५०० लिटर क्षमतेच्या १०० टाक्यांचे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे १०० टाक्या जिल्हातील दुष्काळग्रस्त भागात देण्यात येणार आहेत. यावेळी मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहराध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, उमेश रसाळकर उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी वाजता मडकी वस्ती येथे बोर मारण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राज ठाकरे करतील. त्यानंतर ते मराठवाड्यातील परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर आदी भागांचा दौरा करून उळे गावातील ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करतील. सायंकाळी पाचला हिप्परगा तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करतील.

गर्दीमुळे प्रवक्त्यांचा मुरगळला पाय
जिन्यावरून खाली उतरताना तेथील गर्दीच्या रेट्यामुळे मनसे प्रवक्ते तसेच दादर येथील नगरसेवक संदीप देशपांडे यांचा पाय मुरगळा. ते विव्हळले. सोलापुरातील कार्यकर्ते ओंकार विभुते, राहुल अक्कलवाडे, अभिषेक रामपुरे यांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कार्यकर्त्याचा सेल्फी मोह
पाण्याच्याटाकीचे वाटप झाल्यानंतर एका उत्साही कार्यकर्त्याने राज ठाकरे यांच्या जवळ जाऊन सेल्फीची इच्छा व्यक्त केली. उकाड्याने हैराण राज यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्याला दूर केले.