आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, सोलापुरात विविध भागांना भेटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोलापुरात दोन दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत. बुधवारी येथे येतील, अशी माहिती जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

जळकोट येथे दुष्काळी भागाची पाहणी करतील. तेथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात करतील. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात येईल. १०० पाण्यांच्या टाक्यांचे वाटप करतील. आत्महत्या केलेल्या दोघा विडी कामगार महिलांच्या कुटुंबियांना आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका महिलेस आर्थिक मदत देण्यात येईल.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता परंडा येथे रवाना होतील. परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर भागाची पाहणी करून परतणार आहेत. सायंकाळी पाच वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील ओढा रुंदीकरण गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करणार आहेत. शुक्रवारी सकाळी तुळजापूरमार्गे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

यावेळी पक्ष कार्यकर्ते शेतकरी बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन श्री. धोत्रे, प्रशांत गिड्डे, उमेश रसाळकर, प्रशांत इंगळे युवराज चुंबळकर यांनी केले आहे.