आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियान: सिद्धरामांच्या मंदिरात राजस्थानी कलाकुसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियांतर्गत मुख्य गाभाऱ्यात आणखी दोन चांदीचे खांब लावले आहेत. गर्भगृहात सजावट सुरू आहे. प्रथम प्राचीन दगडी भिंतींवर बर्माटिक लाकूड लावून त्यावर कोरीव काम करण्यात येणार आहे. राजस्थानातून अालेले बारीक कोरीव काम करणारे कारागीर लाकडाला आकार देत आहेत.

मागच्या आठवड्यात सिद्धरामेश्वर मंदिरातील गर्भगृह सजावटीसाठी अडीच हजार किलो बर्माटिक लाकूड मागवण्यात आले होते. राजस्थानच्या पाली बडगाव येथून दोन कारागीर लाकडावर कोरीव काम करण्यास बोलावले आहेत. सिरोई, बडगाव येथून ज्येष्ठ कारागीर चुनीलाल बडगाव त्यांच्यासोबत चामुंडेरी, पाली येथील ईश्वरसिंग पवार आले आहेत. द्रविडी प्रकारातील कोरीव काम आहे. आता लाकडांना पॉलिश छिद्रातून हवा काढत आहेत.

असे काेरीव काम
भिंतींवरबर्माटिक लाकूड पट्टीप्रमाणे लावण्यात येणार आहे. भिंतीवरचे खाचखळगे, उंचवटे नक्षी पाहून तितकेच कापण्यात येणार आहे. नंतर त्यावर शिसपेन्सिलने नक्षीकाम होईल. त्यावर खोलवर कोरीव काम होणार आहे.
राजस्थान, गुजराततसेच भारतातील अन्य राज्यांत अशी कामे केली आहेत. तीन ते चार प्रकारे कलाकुसर करतो. मंदिर कोणत्या काळातील आहे, त्यावर आधी कोणत्या प्रकारची नक्षी आहेत याचा अंदाज घेत त्यासारखी नक्षी काढतो. चुनीलाल बडगाव, कारागीर
बातम्या आणखी आहेत...