आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"राजलक्ष्मी'च्या आठवणीत मुलींचे शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपली दिवंगत मुलगी राजलक्ष्मी हिच्या उदंड शिक्षण घेण्याच्या इच्छेचे स्मरण असावे यासाठी तिच्या आई-बाबांनी पाच गरजू मुलींना दत्तक घ्यायचे ठरवले आहे. २० जून २०१४ रोजी लिफ्ट अपघातात राजलक्ष्मीचा मृत्यू झाला होता. खूप शिकून मोठे व्हावे, ही राजलक्ष्मीची इच्छा होती. ही इच्छा ध्यानी घेत तिचे छोटेखानी वर्षश्राद्ध करून जयश्री आणि संजय शिंदे या माता-पित्यांनी गरीब मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरस्वती मंदिर कन्या प्रशालेतील मुलींना दत्तक घेतले आहे.

लिफ्टमधील अपघातामुळे नगरसेविका जयश्री संजय शिंदे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. वडील संजय शिंदे यांना राजलक्ष्मीच्या अभ्यासूपणाचा आणि हुशार असल्याच्या आठवणींचा विसर पडणे शक्यच नव्हते. त्यांनी पत्नी जयश्री यांना वर्षश्राद्ध छोटे करू मात्र तिच्या शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन मदत करू, असे सांगितले. राजलक्ष्मीची आठवण कायम करणारा हा विचार घरातील आजोबा, मामा, आत्या आणि सर्वांनाच पसंत पडला.
"राजलक्ष्मी'च्या आठवणीत मुलींचे शिक्षण

अश्रू ढाळत बसण्यापेक्षा सकारात्मक विचार केला
आम्ही राजलक्ष्मीला विसरणे केवळ अशक्य आहे. तिच्या आठवणीत अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तिच्या आठवणीतून काहीतरी सकारात्मक काम करण्याचे ठरवले आणि हा उप्रकम हाती घेतला आहे. तिचे जाणे आमच्यासाठी वेदनेचे आहे. तिच्या अंसख्य आठवणी सुंदर आहेत. त्या अशा कामांनी जपण्याचे ठरवले आहे. त्यात माझे कुटुंबही सोबत आहे. संजयशिंदे, राजलक्ष्मीचे वडील

अशीही केली मदत
वर्षश्राद्धम्हटले की अनेक लोकांचे जेवण तयार केले जाते. हा सुखाचा कार्यक्रम नसला तरी सांत्वनाचा असतो. शिंदे परिवाराने नातेवाइक आप्तेष्ट यांना निरोप देऊन मोठ्या प्रकारचा कार्यक्रम करणार नसल्याचे आधीच सांगितले. मोठ्या कार्यक्रमाऐवजी बीसी गर्ल्स हॉस्टेलच्या मुलींसाठी त्या रात्री जेवण ठेवले. सरस्वती मंदिर कन्या प्रशालेच्या पाच विद्यार्थिनींना भेटून त्यांना वह्या पुस्तके, पेन, रंगपेटी, कंपास, गणवेश इतर साहित्याची भेट दिली.