आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत एकाच मंचावर, जे नशिबात असेल तेे मिळेल : राज्यमंत्री सदा खाेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- काही दिवसांपासून एकमेकांपासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत रविवारी सांगली जिल्ह्यात एका व्यासपीठावर एकत्र आले. शेट्टी आणि खोत यांच्यात धुसफूस सुरू असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. खोत मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात होती. पुण्यात विश्रामगृहात एकत्र न थांबल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील दुरावा उघड झाला होता. मात्र, रविवारी रयत विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात एकत्र येत त्यांनी या वादावर तूर्तास पडदा टाकल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, ‘स्वाभिमानी शेतकरी ही वाघाची संघटना आहे. एकमेकांना चावा घेण्याचा प्रयत्न करणारच. आम्ही एका व्यासपीठावर आल्याने लोकांना काय समजायचे ते नीट समजले असेल’, असा चिमटा शेट्टी यांनी या वेळी काढला. तर, ‘शेट्टींसोबत वाद नाही. आजपर्यंत कुणाशी वाद न घालता मी येथपर्यंत पोहाेचलो. मग कशाला कुणाशी वाद घालू? जे नशिबात असेल ते मिळेल.’, असे सांगत खोत यांनी वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...