आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन-धनमध्ये जमा पैसा काळा, या पैशातून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,’ : खासदार राजू शेट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी (जि. साेलापूर)- ‘जन-धन योजनेतील बँक खात्यात  जमा झालेले ८७ हजार कोटी रुपये हा काळा पैसा अाहे. या पैशातून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी साेमवारी पत्रकार परिषदेद्वारे केले. शेट्टी म्हणाले, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अतिरिक्त शेतमालाच्या उत्पादनामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे भाव कोसळले अाहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला अाहे. प्रसार माध्यमांकडे काळा पैसा दडला असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयात व निर्यात धोरणामध्ये सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप वाढला अाहे. सातव्या वेतन आयोगासाठी कोट्यवधी रुपयांची खैरात केली जात आहे.  मग शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करायला सरकारला काय अडचण येते, असा सवालही शेट्टी यांनी केला. नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही. शेतमालाचे भाव पडले नाहीत. तसे असते तर त्याविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे काढले असते. जिल्हा बँकेतील पैसा हा पुढाऱ्यांचा काळा पैसा अाहे, शेतकऱ्यांना पुढे करून हे पुढारी आपला पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.   
बातम्या आणखी आहेत...