आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजूरच्या अभियंत्याचे मुंबईत अपहरण, मृतदेह अांध्र प्रदेशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-  अक्कामला रक्षाबंधनाला सुटी नाही. मी शनिवार ते मंगळवार सोलापुरात येतोय. त्यावेळी तुला रक्षाबंधनाची अोवाळणी भेट देतो. नक्की तुझ्याकडे येईन... बहीण भावातील हा संवाद अखेर शेवटचाच ठरला. त्याच दिवशी भावाचे अपहरण झाले अन् शुक्रवारी त्याचा मृतदेह विजयवाडा (अांध्र प्रदेश) येथील कृष्णा नदीच्या पात्रात सापडला. 
 
शीलवंत मल्लिकार्जुन सोनकटले (वय २६, रा. मूळगाव - राजूर, तेरा मैलजवळ, हल्ली नवी मुंबई) असे मृताचे नाव अाहे. रक्षाबंधनासाठी त्यांनी बहिणीला फोनवरून संपर्क करून संवाद साधला होता. दिवसभर कामावरही होता. रात्री मित्रांसोबत गप्पा मारून घरी जाताना वाटेतच त्याचे अपहरण झाले. ते कशामुळे झाले, नेमकी घटना कशी घडली, कारण काय अाहे? याचा काहीच उलगडा झाला नाही. वाशी पोलिसांकडून चौकशीच सुरू अाहे. नेमके अपहरण झाले की, अन्य काही प्रकार घडलाय? याचाही तपास सुरू अाहे. 
 
शीलवंतचे अाई, वडील सोलापुरातील नीलमनगरात राहतात. शीलवंत अायटी इंजिनिअर होता. नवी मुंबई भागातील एका साॅफ्टवेअर कंपनीत काम करीत होता. अाॅगस्ट रोजी घराकडे जाताना अपहरण झाल्याचा मेसेेज त्यांनी मित्राला मोबाइलवर पाठवला. मित्रांनी तातडीने वाशी पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली. वडिलांनाही माहिती दिली. वडील रात्रीच मुंबईला निघाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना भेटून तपासासाठी विनंती केली. तारखेला बेळगावात मोबाइल लोकेशन दाखवले. नंतर विजयपूर, कलबुर्गीपर्यंत मोबाइल लोकेशन होते. नंतर संपर्क तुटला. 

शुक्रवारी सकाळी विजयवाडा (अांध्र प्रदेश) येथील कृष्णा नदीत मृतदेह तरंगताना अाढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर खिशात अाधार कार्ड सापडले. त्यावर सोलापूर नीलमनगरचा पत्ता असल्यामुळे सदर बझार पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती दिली. त्याचे फोटो मागवून घेऊन दाखवल्यानंतर अोळख पटली. वडिलांनाही माहिती दिल्यानंतर ते मुंबईतच असल्यामुळे वाशी पोलिसांना माहिती दिली. त्या पोलिसांनी विजयवाडा पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अोळख पटल्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेऊन सोलापुरात येत असल्याची माहिती शीलवंतचे मामा अप्पासाहेब माने यांनी दिली. पोलिसांनी घटनेदिवशीच तत्काळ हालचाल करून तपास केला असता तर अाज चित्र वेगळे राहिले असते. कदाचित तो जिवंतही राहिला असता, असे नातेवाईक म्हणतात. 
 
मृतदेह आज गावात 
शीलवंतचामृतदेह घेऊन सोलापूरकडे येत अाहेत. शनिवारी पहाटे राजूरला अाणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याच्या मागे अाई लक्ष्मीबाई, वडील मल्लिकार्जुन, भाऊ माळप्पा. दोन विवाहित बहिणी सुजाता (चडचणजवळील जेऊर) तर सोरेगाव येथे अश्विनी नावाची बहीण राहते. दोघींनी रक्षाबंधनासाठी जमणार नाही. पण, रविवारी भेटणार असल्याचे सांगितले होते. पण ही भेट झालीच नाही. यासह अनेक अाठवणींनी नातेवाईक अाक्रोश करीत अाहेत. 
 
तपासात नेमके कारण समोर येईल 
शीलवंतचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अहवाल अाला अाहे. व्हिसेरा राखून ठेवला अाहे. वाशी पोलिसांचे एक पथक तपासासाठी विजयवाडा येथे जाईल. अनेक घटनांची चौकशी होईल. नेमका मृत्यू कशामुळे झाला अाहे? याची माहिती लवकरच समजेल. मृतदेहावर मारहाणीच्या अन्य कुठल्याही संशयास्पद खुणा नाहीत.
- तुषार दोशी, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, वाशी, नवी मुंबई 
बातम्या आणखी आहेत...