आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘MY FM’च्या आरजेंनी सीमेवरच्या जवानांना दिलं श्रोत्यांचं राखीरूपी प्रेम!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
९५ माय एफतर्फे संकलित केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना अारजेंनी बांधल्या. - Divya Marathi
९५ माय एफतर्फे संकलित केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना अारजेंनी बांधल्या.
सोलापूर - चंदीगढमधून आरजे मीनाक्षी, अहमदाबाद मधून आरजे अर्चना, इंदोरमधून आरजे विनी आणि जयपूर मधून आरजे शोनाली राखी पौर्णिमेनिमित्त अखनूर परिसरातील भारत-पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय जवानांना भेटून देशभरातून त्यांच्यासाठी पाठवलेल्या राख्या बांधल्या. शुभेच्छा संदेश, व्हिडीआे दाखवले. विविध प्रांतातील बहिणींचे प्रेम पाहून जवानांचे डोळे पाणावले. 
 
‘माय एफ एम’तर्फे रक्षाबंधन निमित्ताने ‘एक राखी फौजी के नाम’ मोहीम राबवली होती. आरजे यांनी भारतीय जवानांना भेटून ती राखी भेट दिली अन्् ‘माय एफएम’च्या मोहिमेचा समारोप झाला. 
 
‘माय एफएम’च्या पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या श्रोत्यांनी त्यांचे आपल्या जवानांवरचे प्रेम त्यांच्या राख्या, व्हिडीओ, पत्र यांतून व्यक्त केलेले आणि ते जेव्हा भारतीय जवानांपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. या सगळ्या राख्या आणि प्रेम बघून सगळे भारतीय जवान भारावून गेलेले. पंजाबी स्टार मलकीत सिंह आणि प्रिन्स नरूला यांचा व्हिडीओ मेसेज त्यांना दाखवण्यात आला. त्यानिमित्ताने सणाच्या उत्साहाला अधिकच उधाण आले. राख्या, पत्र, माय एफ एमच्या श्रोत्यांचे प्रेम आणि आशीर्वादासोबत चारही आरजेंनी सगळ्या जवानांना राखी बांधली. चंदीगढची पिन्नी, जयपूरची मावा कचोरी, इंदोरचे मावा पेढे आणि अहमदाबादच्या मोहन थालीने आपल्या जवानांचे तोंड गोड करण्यात आले. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, आरजे आणि भारतीय जवानांनाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...