आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षा गोरटे हिची जागतिक योग क्रीडा चॅम्पियनशिपसाठी निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मलेशिया येथे होत असलेल्या २४ व्या हौशी जागतिक योग क्रीडा चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सोलापूरच्या रक्षा गोरटे हिची निवड झाली आहे. येत्या १८ ते २१ डिसेंबरदरम्यान राजधानी क्वालालंपूर येथे स्पर्धा होत आहे. याचे आयोजन मलेशियन योग क्रीडा संघटना करत आहे.

१७ वर्षाच्या रक्षाने एशियन योग स्पर्धेत आणि सुपर सिक्स ऑफ इंडियन यामध्ये अव्वल राहण्याचा मान पटकावला आहे. मलेशियाच्या चॅम्पियनशिपसाठी तिने राष्ट्रीय स्पर्धेतून प्रवेश मिळविला आहे. अॅथलेटिक येाग, रिदम योग, आर्टिस्टीक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, डान्स योग सिंगल आणि डॉन्स योग पेअर अशा सहा प्रकारात ती सहभाग नोंदवणार आहे. लवचिक शरीरयष्टी असलेली रक्षा यात तरबेज आहे. या खेळाचा तिचा प्रवास तिसरीपासून सुरू झाला आहे. यासाठी आई आरती आणि वडील मिलिंद यांचा पाठिंबा आहे.

पदक आणणार
जगापुढेस्वत:लासिद्ध करण्याची ही एक संधी आहे. पदक आणण्याचा १०० टक्के प्रयत्न करणार आहे.” रक्षा गोरटे, राष्ट्रीययोग खेळाडू

तिच्या कष्टाचे फळ
लहानपणापासूनप्रशिक्षणघेते. दहावीत राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला, त्यावेळी तिला अभ्यासात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले होते. ती गुणी कष्टाळू आहे. तिला जागतिक स्तरावर संधी मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.” स्नेहल पेंडसे, योगप्रशिक्षिका
बातम्या आणखी आहेत...