आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निघाल्या सवाद्य मिरवणुका; पोलिसांचे नियोजन नसल्याने वाहतुकीची कोंडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सायंकाळी बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिर येथून मंडळांच्या जयंती मिरवणुका निघाल्या. - Divya Marathi
शुक्रवारी सायंकाळी बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिर येथून मंडळांच्या जयंती मिरवणुका निघाल्या.
सोलापूर- अनुभवमंटप उभारून समाजाला समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव शुक्रवारी मोठ्या भक्तिभावात जल्लोषात झाला. सकाळी कोंतम चौक येथील पुतळ्यास अभिषेक करण्यात अाला. तर सायंकाळी कसबा, मंगळवार पेठेतून सवाद्य मिरवणूक काढण्यात अाली. विविध मंडळांचा सहभाग मिरवणुकीत होता. दरम्यान पोलिसांनी नियोजन केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. 

सकाळी नऊ वाजता कोंतम चौकातील पुतळ्यास महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात अाला. सायंकाळी बसवेश्वर मूर्तीच्या मिरवणुका निघाल्या. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रारंभ झाला. तेथून बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ पोलिस चौकी, कुंभारवेस, क्षत्रिय गल्लीमार्गे निघून कोंतम चौक येथे मिरवणुका विसर्जित झाल्या. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिरवणुकांना प्रारंभ करण्यात अाला. त्यानंतर अचानकपणे पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सहभागी मंडळांची धावाधाव झाली. सुमारे २० मिनिटांच्या पावसानंतर वातावरण मोकळे झाले. थोडासा गारवा जाणवला. त्यानंतर मिरवणुकांना सुरुवात झाली. दुतर्फा वाहने अडकल्याने वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाला. 

दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, अामदार प्रणिती िशंदे महात्मा बसवेश्वर मध्ववर्ती जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ रकबले, बसव सेंटरचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, बाबासाहेब कुलकर्णी, नंदकुमार मुस्तारे, जगदीश पाटील, महेश अंदेली अादींनी बसवेश्वर पुतळ्यास अभिवादन केले. 
 

पाणीवाचवा संदेश...
मिरवणुकीतसोन्नलगी प्रतिष्ठानने पाणीवाचवण्याचा संदेश दिला होता. शिव-बसव प्रतिष्ठान, सिटी फायटर्स या मंडळांनी प्रकाशझोत टाकणारी यंत्रणा उभी केली होती. रंगबिरंगी प्रकाशात आणि संगीतात तरुणाईने ठेका धरला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून बसव सर्कल येथे रात्री मिरवणुकीची सांगता झाली. 
 
 
वीरेश्वरपुण्याश्रम मठाची िमरवणूक...
येथीलवीरेश्वर पुण्याश्रम मठातर्फे दुपारी चार वाजता किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी, सिध्देश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात अाला. या वेळी सुधीर थोबडे, सकलेश विभूते, इरण्णा तेग्गेळी अादींची उपस्थिती होेती. 

वाहतुकीची कोंडी...
पोलिसांचेनियोजन नसल्याने वाहतुकीची कोंडी झाली. ध्वनीवर कुठलेच नियंत्रण नव्हते. गेल्या आठवड्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सांगता मिरवणूक झाली. तीत पोलिसांनी अतिशय चांगले नियोजन केले होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण नाही अन् वाहतुकीतही अडथळे नव्हते. हा अनुभव शुक्रवारी मात्र नव्हता. पोलिसांचे असे नियोजन बसवेश्वर जन्मोत्सव मिरवणुकीत का झाले नाही? हा सामान्यांचा प्रश्न होता.
बातम्या आणखी आहेत...