आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016 मध्ये राम मंदिर बांधून दाखवाच - अबू आझमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाबरी मशिदीचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असूनही न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आहे. हिम्मत असेल तर 2016 मध्ये बांधकाम करून दाखवा, असे आव्हान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले. इक्बाल मैदानात रविवारी सायंकाळी आझमी यांची जाहीर सभा झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुसलमान हा देशासाठी जीव देणारा आहे, तो कधीही अतिरेकी होऊच शकत नाही. परंतु, मूठभर हिंदुत्ववादी लोक देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन एकमेकांच्या उत्सावाचे स्वागत केले तर आरएसएस आपोआप नष्ट होईल. इस्लाम माणुसकीचा संदेश देतो. पैगंबरांचे विचार अंमलात आणा. आपापसातले वाद मिटवा, असे विचार आझमी यांनी व्यक्त केले. यावेळी काही तरुणांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रमाला आरपीआयचे राजा इंगळे, उत्तम नवगिरे, अबुतालीब डोंगरे, सलमान फारुखी, अप्पा काडादी, अ. रऊफ, मौलाना अजीजुल्लाह, यास्मीन मुल्ला, म. इसाक डोका आदी मान्यवर उपस्थित होते.

आझमी यांची सिद्धेश्वर मंदिरास भेट
समाजवादीपक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबु आझमी यांनी सिद्धेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिर परिसर फिरून त्यांनी पाहाणी केली. सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आझमी यांचे स्वागत करून सत्कार केला. देवस्थान समितीच्या प्रशासनविरोधी लढ्यास आझमी यांनी पाठिंबा दर्शवला. या लढ्यात समितीला सदैव साथ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अशरफ आझमी, सबमान फारुखी, मौलाना अजिजुल्ला, अ. रऊफ शेख यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्ण शक्तीने लढवणार पालिका
येत्यापंधरा दिवसात सोलापुरात पक्षाचे कार्यालय सुरू होईल. पक्ष मजबूत करूनच महापालिका निवडणुकीत उमेदवार उतरवणार आहे. एमआयएमचे नेते फक्त भाषणे करतात, विकास नाही. आमचे उमेदवार मते विभागण्यासाठी नव्हे तर जिंकून येण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. प्रसंगी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर युती करू, अशी माहिती शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत आझमी यांनी दिली.