आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमजान ईद: आरोग्य क्षेत्रात माणुसकी जपा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उच्च शिक्षणासाठी काही शिक्षण संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जातात. त्यामुळे गरिबांची मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. शिक्षण यंत्रणेत मक्तेदारी वाढली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रातही अनेक गरिबाची परवड होत आहे. दवाखान्यात आल्यावर दिलासा देण्याऐवजी भीती दाखवली जाते. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राबाबत शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी चिंता व्यक्त केली. अल्लाहच्या संदेशाचे पालन करा, माणुसकी जपा, एकोपा राखा असा संदेश त्यांनी दिला.

रमजाननिमित्त होटगी रोडवरील ईदगाह मैदान येथे गुरुवारी सकाळी नमाज पठाण झाले. त्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवाना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सुमारे २० ते २५ हजार जनसमुदाय उपस्थित होता. सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मैदानावर गर्दी होती. सकाळी ९.१६ मिनिटांनी नमाज पठणास सुरुवात झाली. नमाज पठणनंतर शहर काझी यांनी उपस्थित बांधवाना संदेश देताना रमजानचे महत्त्व सांगत स्वर्गातील आठ दारापैकी एक दार रोजा करणाऱ्यांसाठी आहे, असे सांगितले. ईदगाह मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त होता. जकात देण्यासाठी गर्दी होती. तसेच ईदगाह मैदानाकडे येणारी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.

कुराणातील संदेशानुसार सभी पढे, आगे बढे
शहर काझी म्हणाले, कुराणात शिक्षणाला प्राधान्य आहे. शिक्षणाचे चित्र बदलत आहे. उच्च शिक्षणासाठी कोटीने डोनेशन घेतले जाते. शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी वाढली आहे. ते रोखणे आवश्यक आहे. सध्या बोटावर मोजण्याइतके चांगले मानवतावादी डाॅक्टर आहेत. काही डाॅक्टर पैसे लुटतात. कसाई आणि डाॅक्टरांमध्ये फरक काय? असे म्हणत कोणाला दु:ख झाले तर माफी मागतो, असे शहर काझी म्हणाले.

पुष्प देऊन स्वागत : ईदच्या नमाजनंतर मुस्लिम समाजबांधवांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शिवाय काही ठिकाणी मुस्लिमबांधवांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते.

पावसासाठी प्रार्थना : पावसाचे आगमन झाले. पण, हलक्याशी सरी झाल्या. त्यानंतर त्याने आेढ दिली. शहर, जिल्ह्यात अजूनही दुष्काळी स्थिती आहे. पाणी नसल्याने माणसे आणि जनावरांचे जगणे कठीण झाले. अरे, पावसा ये... या सर्वांवर दुवा कर... अशी विनवणीही या वेळी करण्यात आली.

तरच स्मार्ट सिटी म्हणू
केंद्रसरकारने सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्याने शहर काझी यांनी शासनाचे अभिनंदन केले. स्मार्ट सिटीमुळे नागरी सुविधा मिळतील. पण गरिबांची मुले उच्च शिक्षण घेतील आणि शिक्षणाचे डोनेशन थांबेल. त्यावेळी स्मार्ट सिटी म्हणू असे शहर अमजद अली काझी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...