आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानफूल योजना : विद्यार्थिनीसह महिलांना सक्षम करणारा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शालेय जीवन समृद्ध करणारे आणि वंचित घटकांना समाजसेवेच्या माध्यमाने जगाचे व्यावहारिक ज्ञान देण्याचे काम शहरातील सेवासदन प्रशाला रानफूल योजनेच्या माध्यमातून करत आहे. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना बाहेरच्या जगाची माहिती मिळत आहे. शिवाय झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांमध्ये आरोग्य, शिक्षणाविषयी जनजागृती होत आहे.

२००७ मध्ये ज्येष्ठ साहित्यिक विजया जहागीरदार यांनी आपल्या आई कमलाबाई गोऱ्हे यांच्या स्मरणार्थ एक रक्कम दिली. यातून मुलींसाठी काहीतरी उपक्रम सुरू करा, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यातूनच रानफूल योजनेचा जन्म झाला. शाळेतील विद्यार्थिनीच्या माध्यमातून समाजातील गरीब महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे. २००८ पासून हा उपक्रम सुरू असून याचा लाभ अनेक विद्यार्थिनी महिलांना मिळत आहे.

काय आहे योजना
सेवा सदनमधील इयत्ता नववीतील ५० विद्यार्थिनींना दर गुरुवारी समाजसेवा विषयाअंतर्गत झोपडपट्टी, वाडया-वस्त्यांवर नेण्यात येते. या ठिकाणी राहणाऱ्या महिलांना आरोग्य, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, लिहायला वाचायला शिकविणे, कथा संागणे, कविता म्हणून दाखवणे, त्याचा अर्थ सांगणे, समाजात घडणाऱ्या विविध गोष्टींची माहिती देणे, त्यांच्याकडील मनोरंजनाच्या गोष्टी जाणून घेणे, त्याचे सादरीकरण करून घेणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबविणे, सणांची माहिती, त्याचे महत्त्व समजावून सांगणे असे विविध प्रकारचे शिक्षण मुलींच्या माध्यमातून देण्यात येते. यंदाच्या वर्षी इथे दिले शिक्षण : मुख्याध्यापिकाउषा हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली दर गुरुवारी हा उपक्रम राबविला जातो. एका परिसराची निवड करून मुलींना त्याठिकाणी नेण्यात येते. मुली तेथे महिलांमध्ये जनजागृती करतात. यंदाच्या वर्षी थोबडे वस्ती, पाटील वस्ती, रामवाडी, फॉरेस्ट, देगाव नाका, नरसिंग गिरजी मिल, निराळे वस्ती, धुम्मा वस्ती, आमराई, कुमार चौक येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमात सहभागी मुलींना अंजली सुपेकर, लता पोटफोडे, सुमन पुराेहित, मीनल उदनूर, सुरेखा सुरवसे, वंदना लांबतुरे या शिक्षिका सहकार्य करतात.व्यावहारिक ज्ञान मिळते

^रानफुलाच्याउपक्रमामुळेखूप काही शिकायला मिळते. शालेय जीवनापेक्षा व्यावहारिक ज्ञानाची भर पडते. शाळेबाहेरील जगाची माहिती मिळते. विविध प्रकारच्या महिलांशी संवाद साधताना आत्मविश्वास वाढतो. सानिकाकुलकर्णी, विद्यार्थिनी

यंदाच्या वर्षी इथे दिले शिक्षण
मुख्याध्यापिका उषा हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली दर गुरुवारी हा उपक्रम राबविला जातो. एका परिसराची निवड करून मुलींना त्याठिकाणी नेण्यात येते. मुली तेथे महिलांमध्ये जनजागृती करतात. यंदाच्या वर्षी थोबडे वस्ती, पाटील वस्ती, रामवाडी, फॉरेस्ट, देगाव नाका, नरसिंग गिरजी मिल, निराळे वस्ती, धुम्मा वस्ती, आमराई, कुमार चौक येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमात सहभागी मुलींना अंजली सुपेकर, लता पोटफोडे, सुमन पुराेहित, मीनल उदनूर, सुरेखा सुरवसे, वंदना लांबतुरे या शिक्षिका सहकार्य करतात.व्यावहारिक ज्ञान मिळते
रानफुलाच्याउपक्रमामुळेखूप काही शिकायला मिळते. शालेय जीवनापेक्षा व्यावहारिक ज्ञानाची भर पडते. शाळेबाहेरील जगाची माहिती मिळते. विविध प्रकारच्या महिलांशी संवाद साधताना आत्मविश्वास वाढतो.
सानिका कुलकर्णी,विद्यार्थिनी
निर्भय बनतात मुली
बाहेरचे जगमाहिती नसल्याने मुली बुजऱ्या होतात. त्यांना अचानक बाहेर नेले की त्या घाबरतात. बाहेरच्या जगाची माहिती देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. शिवाय समाजातील महिलासंाठीही काही करत आहोत याचे समाधान मिळते. उषाहंचाटे, मुख्याध्यापिका, सेवासदन

बातम्या आणखी आहेत...