आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेविकेला नोकरीचे अमिष देऊन डॉक्टर घेऊन जात होता लॉजवर, लग्नाचेही दिले होते वचन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - वैद्यकीय अधिकारी सोबत काम करणाऱ्या आरोग्य सेविकेवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. आरोग्य सेविकेला लग्नाचे वचन देऊन डॉक्टर तिला लॉजवर घेऊन जात होता आणि तिथे तिच्यावर अत्याचार करत होता. महिलेने लग्न करण्याची मागणी केली तर तिला जीवे मारण्याची धमकी डॉक्टरने दिली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेऊन डॉक्टरविरोधात फिर्याद नोंदवली आहे.
 
काय आहे प्रकरण
सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने एका महिलेस ‘माझ्या भरपूर ओळखी आहेत, मी तुला सरकारी नोकरीमध्ये कायम करतो. तुझ्या सोबत लग्न करतो, असे म्हणून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केले. अशी फिर्याद पीडीत महिलेने शनिवारी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर डॉक्टरवर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 
 
डॉक्टर म्हणायचा नोकरी लावून देतो, लग्न करतो...
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला आरोग्यसेविका आहे. एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे दोघांची ओळख झाली. 
- 25 डिसेंबर 2016 ते 25 मे 2017 या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील करकंब ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी  डॉ. तुषार सुधाकर सरवदे याने पीडित महिलेवर अत्याचार केले. 
- डॉक्टर महिलेला सांगायचा, की माझ्या मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी असून तुला सरकारी नोकरी मध्ये कायम करतो.  तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणून डॉक्टरने स्वतःच्या घरी, लॉजवर वेळोवेळी नेऊन जबरदस्ती केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.  
- पीडीत महिलेने जेव्हा डॉ. सरवदे याला ‘तु माझ्या बरोबर लग्न कर.’ असे म्हटल्यानंतर त्याने ‘मी तुझ्या बरोबर अत्याचार केल्याचे तु कोणास सांगितले तर याद राख.’ असे म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. 
- डॉक्टरने बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडीत महिलेने दिली आहे. महिलेच्या फिर्यादीची दखल घेत पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे तपास करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...