आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संकटात, मंत्री परदेशात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अवेळच्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी सावरला नाही, तोच मोसमी पावसाने ओढ दिली. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात आला. अशा वेळी त्यांना मदत करण्याचे सोडून मुख्यमंत्री परदेशात गेले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे केली.
मुख्यमंत्रिपदावर असताना शरद पवार परदेशात गेले होते, पण वेळ बघून. केंद्र राज्यातील सरकारांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. ही भांडवलदारांची सरकारे आहेत, अशी चौफेर टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते, आदी दिग्गज नेते मंचावर होते. कार्यकर्त्यांमुळे सभागृह भरले होते. स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जमिनीवर बसले होते. काहीजण उभे होते.

यांना खडे बोल...
मोहोळचे आमदार रमेश कदम यांचे नावही घेता श्री. पवार म्हणाले, “पक्ष बदनाम होईल, असे कुठलेही कृत्य करू नका. शिस्त बिघडू देऊ नका. आपण समाजाचे आहोत, ही भावना नेहमी लक्षात ठेवा. विधासभेत विश्वस्त म्हणून जातो. याचे भान ठेवा. सगळ्यांना मान-सन्मान द्या.”

पुन्हा रणशिंग फुंकू
शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा सोलापूर जिल्हा आहे. लोकसभा आणि विधानसभेतील अपयशाने खचून जाणार नाही. केंद्र राज्यातील जातीयवादी पक्षाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर मांडून पुन्हा एकदा रणशिंग फुंकू.” सुनीलतटकरे, प्रदेशाध्यक्ष

कार्यकर्ताच कणा
कार्यकर्ताहाच पक्षाचा कणा असतो. त्याला जपण्याचे कार्य नेत्यांनी करावे. जिल्ह्याचा अध्यक्ष हा सर्वांचा असावा. सहा महिन्यात तालुक्यात बूथनिहाय समित्या झाल्या पाहिजेत. काम करायचे नसेल तर जागा अडवून ठेवू नये.” अजितपवार, माजी उपमुख्यमंत्री
तुम्ही रस्त्यावर
केंद्र राज्यात नकारात्मक मतांवर सत्तांतर झालेे. यात सामान्यांची फसवणूक झाली. या मुद्द्यावर आम्ही सदनात संघर्ष करत आहोत. तुम्ही रस्त्यावर या. सामान्य माणसाला आपल्या भावना कळवा.” धनंजयमुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

दुपारी बाराच्या सुमारास मेळाव्यास सुरुवात झाली. साधारण एकच्या सुमारास माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते यांच्या निधनाची वार्ता सभागृहात थडकली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, विजय-प्रताप युवा मंचचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते, माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस आदी निघून गेले. तत्पूर्वीच विजयसिंह यांचे भाषण झाले होते.

धनगर समाजास आरक्षणाचे वचन दिले होते. त्याचे काय झाले? मुस्लिमांचे आरक्षण काढून टाकले. मराठ्यांचे न्यायप्रविष्ठ ठेवले. फडणवीस, गडकरी नागपूरचे, मुनगंटीवार चंद्रपूरचे, बापट, जावडेकर पुण्याचे. एक तरी चेहरा ग्रामीण? खडसे शेतकऱ्यांचे वाटले, पण वंगाळ बोलू लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून सामान्यांना अनेक स्वप्ने दाखवली. गेल्या वर्षी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पण, रमजान ईदची शुभेच्छा का द्यावीशी वाटत नाही?

सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, पंकजा मुंडे यांचे काय चालले आहे? स्मृती इराणी यांची पदवी नाही. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची डिग्री बोगस.भ्रष्टाचार सर्वत्र दिसतोय, असे खुद्द उद्धव ठाकरे म्हणतात. कधीही आणीबाणी लागू होईल, असे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी बोलतात. हे कशाचे द्योतक आहे?