आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय समाज पक्षाने केले मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्यस्तरीय संकल्प मेळाव्याचे शनिवारी दुपारी सोलापुरात आयोजन करण्यात आले होते. जुळे सोलापूर परिसरातील अंबर हॉटेलसमोरील खुल्या मैदानात हा मेळावा झाला. वेळ सकाळी ११ ची देण्यात आली असली तरी मुख्य कार्यक्रम दुपारी तीन वाजता सुरू झाला. यावेळी शहर-जिल्हा आणि राज्यभरातून आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी अापापल्या परीने शक्तिप्रदर्शन केले.

मेळाव्यास पक्षाध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्यासह विजयकुमार हत्तुरे, सुनील बंडगर, आबा मोटे, जयंत पाटील, ताजोद्दिन मणेर, अण्णासाहेब रुपनर, प्रा. लक्ष्मण हाके, पोपटराव क्षीरसागर, नितीन धायगुडे, संतोष रुपनर, माऊली सलगर, श्रीमंत हक्के, सचिन पडळकर, अशोक तडवळ, अकबर मुजावर आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी शहराध्यक्ष नितीन शिवशरण यांनी प्रास्ताविक केले. मुख्य भाषणात जानकर यांनी आम्ही मागणारे नाही, तर सांगणारे आहोत (आय एम नॉट डिमांडर, आय एम कमांडर) असे म्हणत भाषणाची सुरुवात केली.
माझं प्रत्येक पाऊल इतिहास रचेल. माझी भूमिका मेणबत्तीची असून दिल्लीच्या लालकिल्ल्यावर पक्षाचा झेंडा रोवण्याचे स्वप्न आहे. भविष्यात पक्षवाढीसाठी पूर्ण प्रशिक्षित अशा ५०० पुरुष ५०० महिलांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले. यापुढे सोलापूरला रासपचा बालेकिल्ला म्हणून संबोधले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरपंच संघटनेचे जयंत पाटील यांनीही दुधाचे आंदोलन यशस्वी केल्याचे सांगितले. भोपाळहून आलेल्या सिराज अहमद यांनी पक्षप्रवेश करीत मध्य प्रदेशातही पक्षाचा झेंडा नेत पक्ष वाढवू, असा शब्द दिला. राज्य महिलाध्यक्षा भातांबरेकर यांनी महिलांचा वाढता सहभाग पाहून आनंद व्यक्त केला.

नवनव्या घोषणांचा आला प्रत्यय
अनेकांनी आपल्या भाषणात जय हिंद, जय भीम, जय मल्हार याचा वापर केला तर काहींनी जय रासप अशा घोषणा दिल्या. प्रदेश प्रवक्ता विष्णू चव्हाण यांनी घर घर मोदी या घोषणा आपण दिल्या, आता हर हर महादेव, घर घर महादेव हा नारा द्या, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...