आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM च्या धर्मसत्येच्या वक्तव्यावर अजित पवारांचा टोला, सरकार भोंदूंच्या आश्रयाखाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे सरकार शेतकरी विरोधी असून सध्याच्या काळात मंत्रालयात शेतकऱ्यांऐवजी भोंदूबाबाचे जास्त चालते. - Divya Marathi
हे सरकार शेतकरी विरोधी असून सध्याच्या काळात मंत्रालयात शेतकऱ्यांऐवजी भोंदूबाबाचे जास्त चालते.
करमाळा (सोलापूर) - आमच्या सरकारने भोंदूबाबांच्या विरोधात कायदा केला. पण हे सरकार भोंदूंच्या आश्रयाखाली काम करत आहे. आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. हे सरकार शेतकरी विरोधी असून सध्याच्या काळात मंत्रालयात शेतकऱ्यांऐवजी भोंदूबाबाचे जास्त चालते. त्यामुळे सध्याचे सरकार भोंदूबाबा धार्जीण सरकार असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी दुपारी पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. या वेळी पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रदीप गारडकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आमदार श्यामल बागल, दीपक साळुंखे, रश्मी बागल, दशरथ कांबळे, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, मकरंद निंबाळकर, रामेश्वर मासाळ, रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सभापती सुवर्णा गाडे, डॉ. प्रदीप जाधव, डॉ. हरिदास केवारे, उपसभापती कल्याण गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रहास निमगिरे, अल्ताफ तांबोळी, कल्पना निकुंभे, नलिनी जाधव, राजश्री माने, बाळासाहेब पांढरे, नितीन खटके, राजू पाटील आदी उपस्थित होते.
अजून काय बोलले पवार पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
बातम्या आणखी आहेत...