Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | ratio of 18 percent deaths to newborn infants

सिव्हिल : नवजात शिशू अतिदक्षता विभागात 18 टक्के मृत्यूचे प्रमाण

रमेश पवार | Update - Oct 10, 2017, 10:20 AM IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) नवजात शिशू अतिदक्षता विभागात महिन्याकाठी सरासरी १६ त

 • ratio of 18 percent deaths to newborn infants
  सोलापूर- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) नवजात शिशू अतिदक्षता विभागात महिन्याकाठी सरासरी १६ ते १८ टक्के नवजात बालकांचा मृत्यू होतो. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात नवजात शिशू मृत्यू प्रमाणाची माहिती घेतली असता कोल्हापूर - १२ ते १५ टक्के, लातूर - २०.१ टक्के, मिरज- २२ टक्के असे सरासरी प्रमाण आहे. कमी कालावधीमध्ये जन्मल्याने मेंदू विकृती, श्वास- अन्न नलिकेच्या समस्या तसेच प्रमाणापेक्षा अति कमी वजन, शारीरिक व्यंग आदी नवजात बालके दगावण्याची कारणे आहेत.

  शहरात जिल्हा रुग्णालय नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या यंत्रणेवर भार पडतो. सिव्हिलमध्ये बालरोग विभाग आहे, परंतु शासन मान्य नवजात शिशू अतिदक्षता विभाग नाही. बालरोग विभागात कार्यरत असलेले डॉक्टरच नवजात शिशू विभाग चालवित आहेत. हा विभाग चालविण्यासाठी शासनाकडून मनुष्यबळ नाही. फक्त औषध पुरवठा साधनसामग्री मिळत असून त्यावर योग्य प्रकारे काम चालू आहे.येथील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सध्या ५४ बालकांवर उपचार सुरू आहेत. महिन्याकाठी या विभागात २५० हून अधिक उर्वरित.पान वर

  वजनाने कमी, मेंदू विकृती, श्वास अन्ननलिका नसणे, गंभीर व्यंग यामुळे मृत होतात. साधारपणपणे किलो ग्रॅमच्या वरील बालके वाचली जातात, परंतु त्याच्यावरही उपचार करावे लागतात. बाहेरून दाखल होणाऱ्या नवजात बालकांपैकी ५० टक्के बालके मृत्यू पावतात.
  - डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता

  सिव्हिल नवजात शिश्ू विभागात संख्यात्मकपेक्षा गुणात्मक काम करतोय. अति दक्षता विभागात दाखल होणाऱ्या एकूण नवजात शिशूपैकी १६ ते १८ टक्के मृत्यू होतात. त्यांची कारणे विविध आहेत. वार्डातील बालकांचे मृत्यू प्रमाण दोन ते तीन टक्के आहे. मनुष्यबळ कमी असूनही त्यामध्ये चांगली सुविधा दिली जात आहे.
  - डॉ. एस. व्ही. सावस्कर, विभागप्रमुखबालरोग

  नवजात शिशू मृत्यूची कारणे
  जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार अडीच किलोवरील बालके सदृढ असतात. सोलापुरात ते १.८ किलो ग्रॅम वजनाची बालके जगण्याचे प्रमाण ८४ टक्के आहे. आईचे वजन कमी असल्याने बाळाचे ही वजन कमी, अॅनॉमिक, हार्ट विकार, पाठीवर गाठ, गर्भ पिशवीचे तोंड बंद होणे, अनुवंशिक समस्या, मेंदू विकृती आदी कारणे नवजात शिशू दगावण्यामागची आहेत.

  गरोदर पणात घ्यावयाची काळजी...
  - आयर्न, कॅल्शियमगोळ्या घ्याव्यात, धनुर्वात इंजेक्शन घ्यावे.
  - डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारअन्नात आयन (लोह) फॉलीक अॅसिडचा वापर ठेवा. गर्भाच्या पाठीचा कणा मज्जातंतूतील पेशींच्या निर्मितीस मदत होते. वेळोवेळी डॉक्टरांकडून जाऊन तपासणी करावी.
  - मातेचे वजनव्यवस्थित असावे, ते ते ११ किलोने वाढणे गरजेचे आहे.
  - गरोदरपणात आहारहलका संतुलित पुरेसे कॅलरीज मिळणारा असावा, रोज ६०० मिली दूध वा दुधजन्य पदार्थ नियमित घ्या.
  - ओमेगा फॅटीअॅसिडसचा अन्नात पुरेसा वापर करा ज्यामुळे गर्भाच्या मेंदूचा, मज्जातंतूंचा डोळ्यांचा विकास होण्यास मदत होईल.

  इतर जिल्ह्यातील नवजात मृत्यू प्रमाण
  मिरज- २२ %
  लातूर - २०.१%
  सोलापूर - १८ %
  कोल्हापूर - १२ -१५ %

Trending