आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानात मिळेल भाजीपाला, गूळ, शेंगा, विक्री करण्यास तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रास्तभाव धान्य दुकानातून आता शासनाकडून दिल्या जाणाऱ्या गहू, तांदळाबरोबरच गूळ, शेंगा भाजीपाल्यासह इतर वस्तूही ठेवता येणार आहे. फक्त फरक इतकाच आहे, गूळ, शेंगा भाजीपाल्यासह इतर वस्तू ग्राहकांना चालू दराने खरेदी करावे लागणार आहेत. या वस्तू रेशन दुकानदारास स्वत: खरेदी कराव्या लागणार आहेत. दुकानदारांना फक्त साखर विकता येणार नाही.

खुल्या बाजारातील साखर वगळून आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील िवतरित होणाऱ्या वस्तूसह शेंगा, गूळ, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये, डाळी, रवा, मैदा, बेसन या वस्तू विक्री करता येणार आहे. शासनाच्या परिपत्रकामध्ये खुल्या बाजारातील वस्तूंची िवक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरूपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येईल.

यावस्तूंची विक्री
मध्यप्रदेश सिहोर, गुजरात सिहोर, खांडवा, लोकवन या जातीचे गहू, तांदळामध्ये बासमती, बासमती (तुकडा), बासमती (मोगरा), महाराष्ट्र कोलम, सुरती कोलम, कमोद, मध्य प्रदेश मसुरी, गुजरात मसुरी, आंध्र प्रदेश मसुरी, उकडा आंबेमोहोर, गूळ, शेंगा, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये, डाळी, रवा, मैदा, बेसन भाजीपाला या वस्तूंची रास्त भाव धान्य दुकानातून विक्री करता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...