आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानातून ‘पॉस’ने धान्याचे वितरण सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून संगणकीय शिधापत्रिका मिळणार? या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. गुरुवारी शहरातील झोनमधील झोनमधील २६ क्रमांक दुकानातून पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात आले. 

बोगस लाभार्थींना धान्य वाटप काळ्या बाजारात धान्य विक्रीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या यंत्रणेचा म्हणजेच पॉस मशीनद्वारे धान्य वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी जिल्ह्यातील होटगी (ता. दक्षिण सोलापूर), फुटजवळगा (ता. माढा) याठिकाणी पॉस मशीनद्वारे धान्य वाटपाची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली. 
 
अशी आहे प्रक्रिया 
‘पॉस’मशीनमध्ये शिधापत्रिकाधारकांची माहिती असेल. प्रत्येक नागरिकास एक बारकोड क्रमांक असणार आहे. दुकानदारांनी तो बारकोड क्रमांक दाबल्यावर त्या कुटुंबाची सर्व माहिती दिसेल. संबंधित कुटुंब कोणत्या योजनेचा लाभ घेतो, त्याला किती धान्य मंजूर आहे, त्याची एकूण रक्कम किती? याची सर्व माहिती आल्यानंतर त्याला धान्याचे वितरण करण्यात येईल. त्याला धान्य दिल्याची पावतीही पॉस मशीनमधून मिळणार आहे. 

चाचणीवेळी सहायक वितरण अधिकारी रमा जोशी, जिल्हाध्यक्ष विजय हिरेमठ, सुनील पेंटर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी दोन्ही दुकानांतून प्रत्येकी ५० नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित दुकानांमध्येही मार्चअखेरपर्यंत पॉस मशीन उपलब्ध होणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी पाटोळे यांनी स्पष्ट केले. 

शहरातील दुकान क्रमांक २६ मध्ये पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्यात आले. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, सहायक वितरण अधिकारी रमा जोशी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय हिरेमठ आदी.