आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recruitment Scam: Deputy Registrar Along With Four Will Disqualify

भरती घोटाळा : उपकुलसचिवसह चौघे अपात्र, सेवामुक्तीची होणार कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठातील भरती घोटाळ्या संदर्भातील डॉ. अरुण निगवेकर समितीने ७४ पैकी अधिकारी अपात्र घोषित केले आहे, तर इतर ७० जणांना क्लीन चीट दिले आहे. या प्रकरणी दोषींवर शासनाकडून कारवाई करण्याचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले असून महिनाअखेरपर्यंत कारवाई होईल. यापूर्वी या प्रकरणातील दोन अधिकारी वेतन निर्धारणात अपात्र ठरले होते. त्यांच्यावर सेवामुक्तची कारवाई झालेली आहे.

निगवेकर समितीच्या अहवालावरून उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला अहवाल पाठविला आहे. यात उपकुलसचिव उमराव मेटकरी, सहाय्यक कुलसचिव एस. एन. शिंदे, कक्ष अधिकारी देवयानी पांढरे नळ कारागिर पंकज व्हनमाने यांना नैसर्गिक न्यायतत्त्वाने सेवामुक्तीची कारवाई' करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

कुलसचिव शिवशरण माळी म्हणाले, नगवेकर अहवालाबाबतचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले आहे. व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी अहवाल पत्राचा आधार घेत, सेवामुक्त का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस देण्यात आली आहे. सात दिवसांच्या अवधीत आपले म्हणणे मांडायची संधी दिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी याच समितीच्या अहवालानुसार सुशील बनसोडे आनंद चव्हाण यांची सेवामुक्ती झाली होती. आता तीन अधिकारी एक कर्मचारी यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई होत आहे.

निगवेकर समितीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर शासनाने सेवामुक्त कारवाईसंदर्भातील पत्र विद्यापीठाला पाठवले. नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत. डॉ.शिवशरण माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

आता पुढे काय?
सातदिवसांच्या नोटिसीनंतर या अधिकाऱ्यांचे म्हणणे विद्यापीठ विचारात घेत सेवामुक्तीची कारवाई करेल. रिक्त पद भरण्यास विद्यापीठ शासन परवानगी घेईल. दरम्यान, अन्याय झाल्याचे म्हणणे असल्यास आपल्या सेवामुक्तीच्या कारवाईविरुद्ध या अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयात दाद मागता येईल.

विद्यापीठ फंडातूनच वेतन होणार वजा
अपात्रचारही जणांना मासिक सुमारे दीड लाख रुपये वेतन अदा करण्यात येत होते. गेले तीन वर्षे म्हणजे २०१२ पासूनचे सुमारे ५४ लाख रुपये वेतन विद्यापीठ फंडातूनच वजा होणार आहे.

निगवेकर समितीचा सहा जणांवर ठपका
तत्कालीनकुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांच्या कार्यकाळात अनियमित नियमबाह्य पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप होत असताना भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचा सतत डांगोरा पिटला जात होता. निगवेकर समितीने आधी दोन तर आता चार अधिकाऱ्यांना अपात्र ठरवले. मात्र खऱ्या भरती घोटाळ्याला जबाबदार असणारे कुलगुरू कुलसचिव कारवाईच्या जाळ्याबाहेरच आहेत.

माजी कुलसचिवांना द्यावा लागला होता राजीनामा
तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी सेवानिवृत्त होण्याआधी म्हणजे २०१२ मध्ये घाई गडबडीत केलेली नोकरभरती विद्यापीठाच्या अंगलट आली. या भरती घोटाळ्याचे प्रकरण शेकू नये यासाठी तत्कालीन कुलसचिव डॉ. नितीन सोनजे यांना २०१४ मध्ये तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला होता. तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री प्रा. राजेश टोपे यांनी तक्रारींचे स्वरूप पाहून सोलापूर विद्यापीठावर भरती बंदी लागू केली.