आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दर घटले तरी भाडे कमी होईना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शुक्रवारी मध्यरात्रीपासून इंधनाच्या दरात कपात करण्यात आली. पेट्रोलचे दर २.४३ पैसे तर डिझेलचे दर ३.६० पैशांनी कमी झाले. जुलै महिन्यात दोन वेळी दर कपात झाली. इंधनाचे दर वाढले की एसटी, रिक्षा, स्कूलबसच्या दरात तत्काळ वाढ केली जाते. याउलट इंधनाच्या दरात कपात झाल्यानंतर मात्र जैसे थे स्थिती असते. इंधनाचे दर वाढ आणि कपातीच्या निर्णयानंतरही सर्वसामान्याच्या डोक्यावरील प्रवासीभाड्याचे ओझे मात्र कायम असते.
गेल्या महिनाभरात दोन वेळा इंधनाच्या दरात कपात झाली. मात्र, प्रवासी वाहतुकीच्या दरात फारसा काही फरक पडला नाही. पूर्वीप्रमाणेच भाडे आकारले जाते. या उलट पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली असती तर प्रवासी भाड्यात वाढ करण्याची मागणी झाली असती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी लगेच वाढ केली असती. इंधनाचे दर वाढले काय आणि कमी झाले काय सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावीच लागते, अशी स्थिती आहे.

शालेयसमिती नावालाच
शालेयपरिवहन समिती गठन करण्याचा अधिकार शिक्षण विभागाला आहे. समितीचा अध्यक्ष संबंधित शाळेचा मुख्याध्यापक असतो. पालक संघटनेचा प्रतिनिधी हा सदस्य, तसेच ही शाळा ज्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असते त्याचा पोलिस निरीक्षक आरटीओ क्षेत्रातील मोटार वाहन निरीक्षक स्कूल बस अथवा रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी अशाप्रकारे ही संघटना बांधणी असते. शालेय समितीला दरनिश्चित करण्याचे अधिकार आहेत. बैठक घेऊन ते सूचना करू शकता.

पालकांची जागृती महत्त्वाची आहे
पेट्रोलडिझेलच्या दरांत एक रुपयाची जरी वाढ झाली, तरी वाहतूक शुल्कासाठी शालेय प्रशासनाकडून वाढ करण्यात येते. मात्र दर घसरल्या नंतर शुल्क कमी का केले जात नाही. याबाबत पालकांनी एकत्रित येत प्रशासनाला जाब िवचारायला हवा. सुनीलचिंता, पालक

इंधनाचे दर कमी होण्याचा संबंध नाही

पर्वीएका गाडीत जवळपास २० ते २५ जण बसायचे पण आता आसन क्षमता १२ ची केल्यामुळे भाडेवाढ केली. ६०० रुपये पहिल्या किमीचा टप्पा त्यापुढे १०० रुपये दर आहेत. यात इंधन कमी होण्याचा काहीही संबंध नाही. श्रीनिवासजमदाडे, मनसेरिक्षा बसवाहतूक संघटना

रिक्षा अन्य वाहतुकीचे तीन १३
सोलापुरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारतात. शहरातील प्रत्येक रिक्षाला मीटर आहे, पण त्याचा वापर होत नाही अशी स्थिती आहे. शिवाय मीटर सदोष असल्याची तक्रार प्रवाशांची असते. त्यामुळे ठरवून भाडे घेण्याची पद्धत शहरात प्रचलित आहे. याचा फायदा घेत रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. रात्रीच्या वेळी तर मनमानी भाडे घेतले जाते. पुण्यात दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी १८ रुपये मोजावे लागतात. पुढील प्रत्येक किलोमीटरला १२ रुपये ३१ पैसे असे दर आहेत. शिवाय तेथे इलेक्ट्रॉनिक्स निर्दोष मीटर असून प्रत्येक रिक्षात दरपत्रक असतात.
विष्णू कांबळे
प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग

आता होणार बैठक
पेट्रोलडिझेलच्या दरातील चढउतारामुळे वाहनांच्या भाड्याची दरनिश्चिती करणे अवघड जात होते. परंतु, येत्या १५ दिवसांत रिक्षाचे बसचे दर निश्चित करण्यासाठी परिवहन प्राधिकरणाची बैठक बोलावली जाईल. या बैठकीत किलोमीटरप्रमाणे रिक्षाचे अन्य वाहनांचे दर ठरविले जातील. बजरंगखरमाटे, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी

विद्यार्थी वाहतुकीच्या दरावर नाही नियंत्रण
रिक्षा,अॅपेरिक्षांच्या भाड्यावर नियंत्रण नाही. अशीच स्थिती विद्यार्थी वाहतुकीबाबतही आहे. शालेय परिवहन समितीला विद्यार्थी वाहतूक करणारे बस आणि रिक्षांचे दर निश्चित करण्याचे अधिकार आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये शालेय परिवहन समिती अस्तित्वातच नसल्याने दर निश्चिती कोण करणार? हा प्रश्न निर्माण होत आहे. दरनिश्चित नसल्याने सोयीनुसार भाडे आकारणी केली जाते.

प्रश्न - शालेयवाहतूक करणाऱ्या रिक्षा, बसेसचे दर कोण निश्चित करते?
उत्तर- शालेयवाहतूक करणाऱ्या रिक्षा बसेसवर शाळा परिवहन समितीचे नियंत्रण असते. तेच त्यांचे दर निश्चित करतात.

प्रश्न- वर्षभरातमोठ्या प्रमाणात इंधनाच्या दरात कपात होऊन देखील दर ‘जैसे थे’च आहेत, त्याचे काय?
उत्तर- शालेयवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या शुल्कात बदल करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित वाहनचालकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यांनीच या मुद्द्यावर लक्ष द्यावे.

५९ शहरांत पालिकेच्या शाळा
3०० रुपये रिक्षाचे कमी पल्ल्यासाठी दर
६०० रुपये रिक्षाचे लांब पल्ल्यासाठी दर
४५० ते ८००
रुपये कमी पल्ल्याचे दर
१००० ते २५००
रुपये स्कूलबसचे लांब पल्ल्याचे दर
२८८
शहरातील एकूण शाळा

आरटीओनी लक्ष द्यावे
माझ्याअखत्यारीत २५९ शाळा आहेत. दरनिश्चिती वगैरे कामे मुख्याध्यापक करतात. आरटीओच्या प्रतिनिधींनी दर कमी करणे अपेक्षित आहे, त्यांनी करावेत. विष्णूकांबळे, प्रशासनाधिकारीमहानगरपालिका प्राथमिक शाळा
बातम्या आणखी आहेत...