आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यात झाले नवे ३४ हजार मतदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकसभा,विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीतील दुबार नावे वगळणे आणि नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत सुरू होती. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील सव्वातीन लाख दुबार नावे वगळण्यात आली आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबर २०१५ मध्ये नोंदणी मोहिमेत ३४ हजार ३८८ नवीन मतदारांची भर पडली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लवकरच मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. आयोगाच्या आदेशानुसार दुबार नावे कमी करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. शिवाय नवीन नाव नोंदणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात राबविण्यात येत आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत ३४ हजार ३८८ जणांची नवीन नोंदणी केली आहे. हजार ४३३ जणांची नावे वगळण्यात आली आहे. हजार ३७९ जणांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली आहेत, तर ७६९ जणांनी स्थलांतरसाठी अर्ज केले होते.

मतदारसंघवार मतदारसंख्या
मतदारसंघपुरुष महिला एकूण
करमाळा १४८०४० १२९२१७ २७७२५७
माढा १५६३८६ १३६६९६ २९३०८२
बार्शी १४८१७४ १३३८०१ २८१९७६
माेहोळ १४८४२१ १२८९३५ २७७३५६
शहर उत्तर १२९११८ १२१४३८ २५०५७१
शहर मध्य १३११७१ १२५२९६ २५६४७०
अक्कलकोट १६२५२७ १४५१७५ ३०७७१६
द. सोलापूर १४२९५० १२३४२७ २६६३७९
पंढरपूर १५६५४८ १४२३८८ २९८९३८
सांगोला १४२७३२ १२४९२१ २६७६५८
माळशिरस १५७५०३ १४०७६५ २९८२७३
एकूण १६२३५७० १४५२०५९ ३० ७५६७६

मागविली माहिती
राज्य आयोगाने आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसंबंधी माहिती मागविली आहे. महापालिकेसंबंधी तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये निवडणुकीसाठी उपलब्ध कर्मचारी, निवडणूक अधिकारी कोण असतील? यासंबंधीची विचारणा करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी कोण असतील, याची संभाव्य यादीही राज्य आयोगाने मागितली आहे.