आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या कुलसचिव मिश्रांचा राजीनामा, नव्या कुलसचिवांचा शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठात कुलसचिव पदावर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी रूजू झालेले डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्याकडे राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने या पदावरून मुक्त करावे, पुन्हा मूळ पदावर रुजू होण्याची अनुमती द्यावी, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. कुलगुरू डॉ. मालदार यांनी राजीमाना मंजूर केला असून, १५ डिसेंबर रोजी ते कार्यमुक्त होतील. सोलापूर विद्यापिठात आजवर पाच कुलसचिव आले. त्यापैकी चार जणांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
कुलसचिवपदी डॉ. मिश्रा मे २०१६ रोजी रुजू झाले. डॉ. मिश्रा हे यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (नांदेड) लातूर येथील उपकेंद्रात संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे कुलसचिव परीक्षा नियंत्रक या संवैधानिक पदांचे प्रशासकीय कामकाज पाहिले आहे. त्यांनी बॉटनी या विषयामध्ये पीएच.डी. प्राप्त केली आहे. डॉ. मिश्रा यांनी प्रा. बी. पी. पाटील यांच्याकडून कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारला होता.
-प्रकृतीच्या कारणामुळेडॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी मूळ पदावर परत जाण्याची अनुमती मागितली. ती देण्यात आली आहे. '' डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
“रूल इज रूल’वर होता कुलसचिव मिश्रा यांचा भर
कर्मचाऱ्यांना शिस्त लावताना त्यांना विश्वासात घेता मेमो संस्कृतीवर भर देत डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. विद्यापीठाच्या प्रशासनात शिस्त राहावी यासाठी ते खूप तळमळीने काटेकोरपणे काम करीत राहिले. कामात चूक होऊ नये, प्रत्येकाने आपल्या कामात तत्पर राहिले पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रहाचा प्रयत्न राहिला. मात्र त्याबरोबरच रूल इज रूल, कामात चुकला की मेमो... आणि उत्तम कामाचे कौतुक होई. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या स्वभावाचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना नाहक मेमो देण्यास प्रारंभ केला. एका कर्मचाऱ्याला तर वरिष्ठ अधिकारी समोरून येत असताना नमस्कार घातला नाही म्हणून मेमो दिला गेला. एका कर्मचाऱ्याने आपल्यावरील अन्यायाची फिर्याद निवेदन देऊन केली. तर हे एक पानाचे निवेदन विद्यापीठातील संगणकावर टाईप का केले म्हणून त्याच कर्मचाऱ्यावर मेमाेचा बडगा उगारला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तपत्रात उत्तम लेखन केले. मात्र, प्रशासनाची पूर्वपरवानगी घेता लिखाण केल्याबद्दल कौतुकाऐवजी हातात मेमो मिळाला. कुलसचिव मिश्रा यांनी असे मेमो देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करता चुप्पी साधली. वृत्तपत्रात निगेटिव्ह वार्तांकन आल्यास ते नाराज होत. संयमीपणाने त्यांनी कुलसचिवपदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

-आरोग्य सांभाळणेकार्य करणे या दोन बाबी वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांशी निगडित आहेत. स्वेच्छानिवृत्तीचा विचार असला तरी त्यासाठी सहा महिन्यांचा कार्यकाळ जातोच नियमानुसार मूळ पदावर राहणे आवश्यक असते. अर्थात तो पुढील विचार आहे, आताच त्यावर काही बोलणार नाही.''
डॉ.देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव

पाच पैकी चार कुलसचिवांचा राजीनामाच
पहिलेशासन नियुक्त : बी. एन. व्हटकर (दोनमहिने कार्यकाळ पूर्ण)
प्रथम- पोपट कुंभार (अडीचवर्षे कार्यकाळानंतर दिला राजीनामा)
द्वितीय- मच्छिंद्र शेजूळ (दीडवर्ष कार्यकाळानंतर िदला राजीनामा )
तृतीय- कॅ. डॉ. नितीन सोनजे (साडेतीनवर्षे कार्यकाळानंतर राजीनामा)
चौथे-अॅड. शिवशरण माळी (तीनवर्षे कार्यकाळ : सेवानिवृत्त)
पाचवे- डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा (सहामहिने कार्यकाळानंतर राजीनामा)
बातम्या आणखी आहेत...