आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझी मैत्रीण अाजारी अाहे. मला पैशाची गरज अाहे' म्हणत नातेवाईकांस 45 तोळ्यांना गंडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘माझी मैत्रीण अाजारी अाहे. मला पैशाची गरज अाहे. पैसे असेल तर द्या नाहीतर दागिने द्या. ते गहाण ठेवून गरज भागवते. नंतर परत अापणास अाणून देते,’ म्हणून वेळोवेळी दोघा महिलांकडून ४२ तोळे दागिने, सात लाख रुपये एका महिलेने घेऊन गेले. काही दिवसांनी दागिन्यांबाबत विचारणा केल्यानंतर टाळाटाळ केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक झाली अाहे. 

फरीद बेगम म. हुसेन शेख (रा. न्यू तिऱ्हेगाव, फाॅरेस्ट, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली अाहे. शमशाद इब्राहिम मुल्ला (रा. पाथरूट चौक, न्यू पाच्छापेठ, सोलापूर) यांच्यासह नेताजी कांबळे, प्रमोद लंगडे (रा. न्यू तिऱ्हेगाव, फाॅरेस्ट) यांना अटक झाली अाहे. तिघांना अाज न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी दिली अाहे. 

एप्रिल २०१६ पासून हा प्रकार सुरू अाहे. शेख मुल्ला हे जवळचे नातेवाईक अाहेत. याशिवाय फरीद शेख यांची जाऊ रशीदा यांच्याकडून काही दागिने पैसे घेऊन गेले. असे एकूण ४२ तोळे दागिने सातलाख रुपयांची फसवणूक केली अाहे. दागिने पैशातून मुुल्ला यांनी एक मारुती व्हॅन टमटम रिक्षा खरेदी केली होती. ती वाहने २१ तोळे दागिने जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली. चौकशी सुरू अाहे. अाणखी कुणाला फसविले अाहे का? याचीही विचारणा होत अाहे, असेही त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...