सोलापूर - ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ९00 वर्षांपासून सुरू आहे. परंपरेनुसार यात्रेतील धार्मिक विधींना मंगळवारी (दि.१०) प्रारंभ झाला. बाळीवेस परिसरातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह सिद्धेश्वर कंटीकर महांतेश कंटीकर मानकरी यांनी आणला. तो शुक्रवार पेठेतील शेटे वाड्यात वाजतगाजत आणण्यात आला. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांचे शेटे यांच्या वाड्यात आगमन झाले. योगदंडाची विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य शिवशंकर कंटीकर तर संबळ वादन कंटीकर योगिराज यांनी केले.
यावेळी शेटे यांचे वारसदार अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. रितेश थोबडे यांनी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, आनंद हब्बू, सुभाष सिद्धलिंग हब्बू यांची पूजा करण्यात आली.
हिरेहब्बू परिवारातील मनोज, जगदीश, विनोद, प्रदीप, संतोष, धनेश, विकास, संजय, सागर आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ झाला. या प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, मानकरी सोमशंकर देशमुख, सुधीर देशमुख, मनोहर सपाटे, शरणराज पुष्कराज काडादी, पंचकमिटीचे बाळासाहेब भोगडे, संदेश भोगडे, सुभाष मुनाळे, मल्लिकार्जुन वाकळे, अॅड. आर. एस. पाटील, मल्लिनाथ जोडभावी उपस्थित होते.
या वेळी सिद्धेश थोबडे, प्रतीक थोबडे, विजय थोबडे, सुचिता थोबडे, मल्लिका थोबडे यांच्यासह नागफणी नंदीध्वज पेलणारे सोमनाथ मेंगाणे, मानकरी तम्मा मसरे, सुधीर थोबडे, नंदीध्वज मास्तर योगिनाथ कुर्ले, अशोक वाले, सुरेश म्हमाणे, गंगाधर कल्याणकर, सचिन बर्हिरोपाटील, शिव सौन्ना, राजशेखर बर्हिरो-पाटील, राजशेखर चडचणकर, बाळासाहेब मुस्तारे, बाबूराव दर्गोपाटील, असिम सिंदगी, बिपीन धुम्मा, मानकरी योगिराज कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार, सुरेश कुंभार, रेवणसिद्ध कुंभार, चंद्रकांत कुंभार, योगेश इटाणे, तम्मा कल्याणशेट्टी, राजू वाले, श्रीशैल पाश्चापुरे, योगेश कल्लूरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.