आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निघाले बाल वारकरी, दुमदुमली अवघी नगरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवालय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत द‍िंडी काढली. - Divya Marathi
शिवालय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत द‍िंडी काढली.
सोलापूर - शहरातल्याप्राथमिक शाळांमधून बाल वारकऱ्यांच्या दिंड्या िनघाल्या. ‘श्रीहरि विठ्ठल, जयहरि विठ्ठल’ करत या मुलांनी लक्ष वेधून घेतले. विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील मुलांसोबत इतर संतांचाही मेळा होता. कपाळावर बुक्का लावलेली चिमुकली मंडळी पालखी घेऊन निघाली. विठ्ठलाच्या नावाने अवघी नगरी दुमदुमली.
चाकाेते शाळा
हैदराबाद रस्त्यावरील सरस्वती चाकोते बालक मंदिर आणि विश्वनाथ चाकाेते प्राथमिक शाळेने दिंडी काढली. मुलांना गोल रिंगणही केले. इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिधा गायकवाड, तनुजा नदाफ, सुनंदा भोसले, सुनंदा स्वामी आदी या दिंडीत सहभागी होते.
साईबाबा मंडळ
शेळगी येथील साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. त्यासाठी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, जानप्पा कांबळे, रमेश जतकर, बसवराज लोहार, संस्था अध्यक्ष शौकतअली शेख आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक इरफान शेख यांनी आभार मानले.
शिवालय आश्रमशाळा
तळेहिप्परगा येथील शिवालय माध्यमिक आश्रमशाळेतील मुलांनी रिंगण सोहळा केला. विष्णुपंत मोरे महाराजांनी विद्यार्थ्यांना उपदेश केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणेशकर, ग्रामपंचायत सदस्या आशा तांबे उपस्थित होत्या. अनंता सुभेदार यांनी आभार मानले.
ऑर्किड स्कूल
नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या मुलांना जुनी मिल कंपाऊंडमध्ये दिंडी काढली. त्यात शाळेच्या संचालिका वर्षा विभूते, उपाध्यक्ष सुरेंद्र कर्णिक, मुख्याध्यापिका कोमल कोंडा, निबंधक सुप्रिया बहिरट यांच्सासह शिक्षकांनी सहभाग घेतला. मुलांना आकर्षक दिंडी काढली.
जय मल्हार शाळा
बाळ्यातील विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानच्या जय मल्हार प्राथमिक शाळा आणि डी. व्ही. ढेपे इंग्लिश मीडियम स्कूलने दिंडी काढली. त्यात भारूड, कीर्तन, अभंग आदी सादर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिगंबर ढेपे यांनी पालखीची पूजा केली. मुख्याध्यापक अमोल ढेपे उपस्थित होते.
मनपा कॅम्प शाळा
महापालिकेच्या कॅम्प शाळेतर्फे लष्कर परिसरातून दिंडी काढण्यात अाली. त्यात मुख्याध्यापक भगवान मुंढे, रेहाना नदाफ, फय्याज शेख, धोंडू केंगळे, रंजना गायकवाड, ज्योती साळुंखे, अश्विनी जवळगे, संध्या वीर, कुसुम गवळी आदी सहभागी झाले होते.
सिद्धेश्वर शाळा
सिद्धेश्वरप्राथमिक शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीत शिक्षण समिती सदस्य अॅड. आर. एस. पाटील, समन्वयक एस. बी. पाटील. लायन्स क्लबचे अध्यक्ष राजीव देसाई आदी सहभागी झाले होते. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, मीराबाई आदींच्या वेशभूषेतील मुलांनी लक्ष वेधून घेतले.
नूमवि मराठी शाळा
नूमव‍ि मराठी शाळा (डफरीनचौक), विलासचंद मोतीचंद मेहता माध्यमिक शाळा (जुळे सोलापूर), छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा (मुरारजी पेठ), एस. बी. प्राथमिक शाळा (कल्याणनगर, मजरेवाडी), बालोद्यान प्राथमिक विद्यालय (जोडभावी पेठ), िरतेश विद्यालय (थोबडे वस्ती), आदर्श विद्यालय (पश्चिम मंगळवार पेठ), अण्णासाहेब प्राथमिक विद्यालय (थोरली इरण्णा वस्ती), के. जी. हंचाटे विद्यालय (राघवेंद्र नगर, अक्कलकोट रस्ता), इंडियन मॉडेल स्कूल (जुळे सोलापूर), जय भारत प्राथमिक शाळा (स्लॉटर हाऊस झोपडपट्टी, उत्तर सदर बझार), महापालिका शाळा क्रमांक (उत्कर्षनगर, विजापूर रस्ता), जिल्हा परिषद शाळा (शेळगी), सुंदराबाई डागा शाळा.
मेहता प्राथमिक शाळा
जुळेसोलापूर येथील कै. वि. मो. मेहता प्राथमिक शाळेत नाट्य आणि सिने अभिनेत्री वनमाला किणीकर यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा पार पडला. संत नामदेव, तुकाराम आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पालखीचे पूजन झाल्यानंतर दिंडी काढण्यात आली. यावेळी प्रमोद जोशी यांनी कीर्तन सांगितले. अभंग आणि रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी सादर केला. कार्यक्रमास मुख्याध्यापिका अलका डंके, दीपा मिर्जी, सरिता कुलकर्णी, विशाख काळे आदी उपस्थित होते.
कस्तुरे हिंदी विद्यालय
कस्तुरेहिंदी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने जनजागरण बाल िंदंडी काढण्यात आली होती. दिंडीची पूजा शाळेच्या मुख्याध्यापिका सुलक्षणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. लेक वाचवा देश वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, वीज वाचवा, पाण्याचा काटकसरीने वापरा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी रोजमेरी गायकवाड, वैशाली शिंदे, शबाना शेख, मंजू गायकवाड, सना कुरेशी, नम्रता गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
गांधी मेमोरियल स्कूल
नॅशनलअसोसिएशन फॉर ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर, राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंड आणि एन.ए. बी निवासी अंधकार्यशाळा यांच्या वतीने दिंडी काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वैशाली जैन, संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम, सचिव शशिभूषण यलगुलवार, माणिक यादव यांची उपस्थिती होती. रत्नदीप सोसायटी, विकासनगर या भागातून दिंडी काढली.