आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूरचे चार हुतात्मे मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांचा आज स्मृतिदिन. स्वातंत्र्यसंग्रामात मार्शल लॉ नंतर दाखल केलेल्या खटल्यात ब्रिटिश सरकारने चौघाही झुंजार स्वातंत्र्यसैनिकांना फाशीची शिक्षा दिली होती. १२ जानेवारी १९३१ रोजी पुणे येथील येरवडा करागृहात या स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या हौताम्याला १२ जानेवारी २०१६ रोजी ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. या खटल्याची सुनावणी सोलापुरातील सेशन कोर्टात सुरू असताना चौघाही स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिश सरकारने सोलापूर जिल्हा कारागृहातील बरॅक मध्ये ठेवले होते. त्यांच्या वास्तव्याच्या स्मृती म्हणून बरॅक मध्ये या शहिदांची तैलचित्रे लावली आहेत.'दिव्य मराठी'चे छायाचित्रकार दत्तराज कांबळे यांनी सोमवारी टिपलेल्या तैलचित्राचे छायाचित्र वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी ही छायाचित्रे 'दिव्य मराठी'साठी उपलब्ध केली.

सोलापूरचे चार हुतात्मे मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांचा आज स्मृतिदिन. स्वातंत्र्यसंग्रामात मार्शल लॉ नंतर दाखल केलेल्या खटल्यात ब्रिटिश सरकारने चौघाही झुंजार स्वातंत्र्यसैनिकांना फाशीची शिक्षा दिली होती. १२ जानेवारी १९३१ रोजी पुणे येथील येरवडा करागृहात या स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या हौताम्याला १२ जानेवारी २०१६ रोजी ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. या खटल्याची सुनावणी सोलापुरातील सेशन कोर्टात सुरू असताना चौघाही स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिश सरकारने सोलापूर जिल्हा कारागृहातील बरॅक मध्ये ठेवले होते. त्यांच्या वास्तव्याच्या स्मृती म्हणून बरॅक मध्ये या शहिदांची तैलचित्रे लावली आहेत. 'दिव्य मराठी'चे छायाचित्रकार दत्तराज कांबळे यांनी सोमवारी टिपलेल्या तैलचित्राचे छायाचित्र वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी ही छायाचित्रे 'दिव्य मराठी'साठी उपलब्ध केली.