आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर मंडपास प्रतिबंध, अंमल आतापासूनच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धीसोलापूर रस्त्यावरमंडप उभारण्यासाठीच्या प्रतिबंधाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी, असा ठराव महापालिका सभागृहाने केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने याविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच तत्काळ अंमलाचे आदेश आहे. तसे केले नाही तर न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे ठराव रद्दबातल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी आतापासून होणार आहे.

रस्त्यावर मंडप उभारण्याबाबत सरकारने कलमी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. महापालिकेने १५ प्रकारची नियमावली तयार करून सभागृहापुढे मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला होता. सोमवारी विशेष सभा घेऊन त्यास मान्यता देण्यात आली. पण, अंमलबजावणी मे २०१६ पासून करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी हरकत घेत अंमलबजावणी तत्काळ करण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहाच्या मान्यतेनंतर १५ दिवसांत जाहीर प्रसिध्दीकरण करावे, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. असे असताना पुढील वर्षापासून अंमलबजावणी करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान होईल. त्यामुळे महापालिका सभागृह अडचणीत येऊ शकते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. याविषयावर कायदेशीर अभिप्राय महापालिका विधान सल्लागार कार्यालयाने दिला.

ठराव विखंडित करणार
रस्त्यावरमंडप उभारण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे िदली आहेत. त्यानुसार प्रसिध्दीकरणानंतर अंमलबजावणी करण्यात येईल. पुढील वर्षापासून अंमलबजावणीचा सभेने केलेल्या ठरावामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे तो रद्दबातल करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.” विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त

आयुक्तांचा अधिकार
सभागृहाचा निर्णय कळवला आहे. मुळात हा विषय सभागृहाकडे पाठवण्याऐवजी आयुक्तांनी अधिकार वापरून अंमलबजावणी करायला हवी होती. न्यायालय निर्णयाचा आदर केला पाहिजे. आतापासून अंमलबजावणी करण्यास आमची अडचण नाही.” संजयहेमगड्डी, सभागृह नेता, महापालिक
बातम्या आणखी आहेत...