आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार प्रकरणामुळे दोन निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेले शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या दोन निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली आहे, तर आणखी दोघंना निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन काढून घेण्याची नोटीस बजावली आहे. लाच घेतल्याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे शासनाने आदेश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले सेतू कार्यालयातील अव्वल कारकून डी.व्ही. कुलकर्णी यांनी १४ लाख ५८ हजार रुपयांचा अपहार केला होता. त्यामध्ये ते दोषी आढळल्याने त्यांची पेन्शन बंद करण्याचे आदेश २८ जुलै २०१५ रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले. भूसंपादन कार्यालय क्रमांक मधील अव्वल कारकून एस.एस. अक्कलकोटे हे २८ फेब्रुवारी २००९ रोजी निवृत्त झाले होते. अक्कलकोटे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
सलगर, बिराजदार यांना नोटिस
भूसंपादनकार्यालय क्रमांक तीनमधील लिपिक जी.एस. सलगर माढा तहसील कार्यालयातील लिपिक व्ही.के. बिराजदार या दोघांनाही लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. न्यायालयाने दोघांनी दोषी ठरवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पेन्शन बंद करण्यासंबंधीची नोटीस बजावली आहे. म्हणणे मांडण्यास १० दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.