आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Revenue Administration Start Setu Offices In District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महसूल प्रशासन चालवणार जिल्ह्यातील सेतू कार्यालये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवेढा वगळता जिल्ह्यातील इतर सर्व ‘सेतू’ कार्यालय चालवणाऱ्या मक्तेदाराची मुदत डिसेंबर २०१५ मध्ये संपणार आहे. मक्तेदारांचा अनुभव पाहता महसूल प्रशासन स्वत:च ‘सेतू’ चालवणार आहे. यास जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनीही दुजोरा दिला आहे. सेतूमधील कारभाराविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात मक्तेदाराकडून १० सेतू कार्यालये चालवली जातात. यामध्ये मंगळवेढा वगळता इतर सर्व सेतू कार्यालयाची डिसेंबरमध्ये मुदत संपणार आहे. बार्शी करमाळा येथील सेतू कार्यालयाचा मक्ता तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी २०१४ मध्ये रद्द केला. यामुळे हे दोन्ही सेतू कार्यालये तहसील कार्यालयाकडून चालवली जात आहेत. माढा, पंढरपूर मोहोळ येथील सेतू चालवण्याचा मक्ता सिद्धिविनायक इन्फोटेक, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर सेतू कार्यालयाचा मक्ता पेस सिस्टिम, माळशिरस येथील सेतू कार्यालयाचा मक्ता सत्यजित कॉम्प्युटर, सांगोला सेतू कार्यालयाचा मक्ता जिजाऊ इन्फोटेक यांच्याकडे आहे.

वरील सेतू कार्यालयाची मुदत संपल्यानंतर स्वत: चालवण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. त्यादृष्टीने मनुष्यबळ, तांत्रिक त्रुटी नियोजनही करण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावात महा सेवा केंद्र संग्राम केंद्र यांनाही परवानगी दिल्याने सेतूवरील गर्दी नियंत्रणात आली आहे. यामुळे भविष्यकाळात सेतू कार्यालय चालवण्याचा मक्ता देण्याऐवजी स्वत:च चालवण्याचा विचार करीत आहे.

महसूलची कर्मचारी संख्या पाहता नियोजनाची गरज
बार्शी करमाळा सेतू कार्यालय मागील वर्षभरापासून तहसील कार्यालयाच्या वतीने चालवण्यात येत आहे. हाच अनुभव लक्षात घेऊन इतर तहसील कार्यालयाकडून सेतू कार्यालय चालवण्याचे नियोेजन आहे. मात्र महसूलकडील कर्मचाऱ्यांची संख्या पाहता नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये अचूक नियोजन पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक ठरणार आहे. एरवी होणारी गर्दीही चांगलीच असते. पण, शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर झुंबड उडते.